मावळच्या कन्येची सर्वत्र चर्चा! प्रणोती नंबरेला राष्ट्रीय विद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेत कांस्यपदक
लखनऊ येथे होणाऱ्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्ससाठी प्रणोती नंबरेची निवड
वडगाव मावळ/प्रतिनिधी
सेंट्रल विद्यापीठ ऑफ हिमाचल प्रदेश या ठिकाणी सुरू असलेल्या राष्ट्रीय विद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेत महिला विभागात भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाची विद्यार्थिनी व मावळ तालुक्यातील पवळेवाडी येथील प्रणोती नंबरेने ७१ किलो वजन गटांत कांस्यपदक मिळविले. या स्पर्धेत प्रणोती नंबरेने ७१ किलो वजन गटांत सहभागी होताना स्नॅच आणि क्लीन अँड जर्क मिळून एकूण १८३ किलो वजन उचलत ब्राँझपदक पटकावले. याआधी झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत प्रणोती नंबरेने सुवर्णपदक मिळविले होते.
संपूर्ण भारतातून ह्या वजनी गटात 32 मुली सहभागी होत्या, खूप चुरशिच्या लढतीत तिने हे पदक मिळवले पुढे जाऊन अंतरराष्ट्रीय पदक मिळवण्याचे तिचे स्वप्न आहे,ती भारती विद्यापीठ पुणे मास्टर ऑफ आर्ट्सला शिकत असून भारती विद्यापीठ अभियंते विश्वविद्यालयाचे कुलपती प्रा. डॉ. शिवाजीराव कदम, भारती विद्यापीठाचे कार्यवाह व भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाचे प्र-कुलगुरू डॉ. विश्वजीत कदम, कुलगुरू डॉ. विवेक सावजी, आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ. अस्मिता जगताप, भारती विद्यापीठाचे सहकार्यवाह डॉ. के. डी. जाधव, कुलसचिव जी. जयकुमार, क्रीडा संचालक डॉ. नेताजी जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक रणखांबे यांनी प्रणोती नंबरचे अभिनंदन केले आहे.
वडगाव मावळ येथील अनिकेत नवघणे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली पाच वर्षापासुन ती वेटलिफ्टिंगचा सराव करत आहे.भारती विद्यापीठ स्पोर्ट डायरेक्टर नेताजी जाधव तसेच ऍडव्होकेट.सुनील पटेकर याचे मार्गदर्शन लाभले, लखनऊ येथे होणाऱ्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्ससाठी तिची नुकतीच निवड झाली आहे, तिला मिळालेल्या यशामुळे आई रोहिणी पांडुरंग नंबरे वडील पांडुरंग चंदर नंबरे यांच्यासह तिचे मावळ तालुक्यातून,सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
About The Author
