'मालवणी पोलिसांचा अहवाल तत्कालीन सरकारच्या दबावाखाली?'

संजय निरुपम यांनी व्यक्त केली शंका

'मालवणी पोलिसांचा अहवाल तत्कालीन सरकारच्या दबावाखाली?'

मुंबई: प्रतिनिधी 

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची व्यवस्थापिका दिशा सालियान हिच्या सोशल मृत्यू प्रकरण मालवणी पोलिसांनी दाखल केलेला तपास बंद अहवाल (क्लोजर रिपोर्ट) तत्कालीन सरकारच्या दबावाखाली तयार केलेला असू शकतो, अशी शंका शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी व्यक्त केली आहे. 

दिशाचा मृत्यू झाला आणि त्याची चौकशी झाली त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे त्यावेळी मंत्री होते आणि त्यांचे नाव या प्रकरणी घेतले होते. त्यामुळे पोलिसांनी तत्कालीन सरकारच्या दबावाखाली हा अहवाल तयार केल्याची शंका घेण्यास वाव आहे, असे निरूपम म्हणाले. 

क्लोजर रिपोर्टच्या आधारावर दिशाचे वडील सतीश सालियान यांच्यावर ठपका ठेवणाऱ्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही निरुपम यांनी टीका केली. तुमच्या पक्षाच्या एका नेत्याने एका मुलीची अब्रू धुळीला मिळवली. तुम्ही आता तिच्या वडिलांची लाज काढत आहात. एका मुलीवर अत्याचार झाले आहेत. तिला न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका ठेवा, असेही ते म्हणाले. 

हे पण वाचा  खंडणी आणि खुनाबाबत प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचा महत्त्वाचा जबाब

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना यांच्यावर विडंबनात्मक गाणे सादर करणाऱ्या कुणाल कामरा याच्यावरही निरुपम यांनी भाष्य केले. कुणाल कामरा हा डाव्या विचारांचा माणूस आहे. भारतात राहून भारताला विरोध करणारे अनेक लोक इथे आहेत. भारताला विरोध करणाऱ्या लोकांना भरपूर निधी पुरवला जात आहे. कुणाल कामरा याला या गाण्यासाठी कोणी किती पैसे दिले हे चौकशीतून समोर येईल. त्याने जर भारत विरोधी, देशद्रोही लोकांकडून पैसे घेतले असतील तर त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होईल, असे मत निरुपम यांनी व्यक्त केले. 

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

ईदची नको, हवी न्यायाची भेट! ईदची नको, हवी न्यायाची भेट!
स्थित्यंतर / राही भिडे हिंदू, इस्लामसह अन्य धर्मातही असे मानले जाते की इतरांना, विशेषतः दुर्बलांना मदत केल्याने पुण्य मिळते. त्यामुळे...
नाट्य परिषद कोथरूड शाखेने उभारली सांस्कृतिक कलावंत गुढी
गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला नव्या संचातील 'तुझे आहे तुजपाशी'चा  रौप्यमहोत्सवी प्रयोग सादर
लष्करी अधिकाऱ्याकडून लष्करी अधिकाऱ्याचीच फसवणूक
ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख शिंदे गटात डेरेदाखल
खंडणी आणि खुनाबाबत प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचा महत्त्वाचा जबाब
महाराष्ट्र बँक सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेकडून सामाजिक कृतज्ञता निधी समर्पण

Advt