वडगाव मावळमधून 32 वर्षीय तरुण बेपत्ता
माहिती मिळाल्यास वडगाव मावळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन
वडगाव मावळ/ प्रतिनिधी
वडगाव मावळ येथील केशवनगर परिरात राहणारा मुकेश दिलीप पासवान (वय ३२) हा रविवारी (दि. १६) सायंकाळी ६ वाजल्याच्या सुमारास बेपत्ता झाला आहे.याबाबत निलेश दिलीप पासवान यांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी (दि. १६) सायंकाळी सहा वाजल्याच्या सुमारास राहते घरातून कोणास काही न सांगता निघून गेला आहे. तो अद्यापपर्यंत घरी आला नाही.बेपत्ता मुकेश पासवान याचा रंग सावळा, उंची ५ पुट ८ इंच अंगाने सडपातळ, उजव्या पायाचा अंगठा नाही, लंगडत चालतो अंगात पांढरा शर्ट काळी पेंट, केस काळे सरळ व काळी दाडी, भाषा मराठी, हिंदी, भोजपुरी बोलतो अशा वर्णनाची व्यक्ती कुठे आढळून आल्यास किंवा त्याबाबत काही माहिती मिळाल्यास वडगाव मावळ पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा.
याप्रकरणी तपास पुढील वडगाव मावळ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अजित ननावारे हे करत आहेत.
About The Author
