महाड मध्ये भीमसृष्टी उभारणार..!
९८ व्या महाड चवदार तळे सत्याग्रह दिन साजरा
महाड
चवदार तळे सत्याग्रह दिनाच्या ९८ व्या वर्धापन दिनानिमित्त मा.मंत्री संजयजी शिरसाट यांनी चवदार तळ्यातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत शेठ गोगावले सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.हर्षदीप कांबळे, बार्टीचे महासंचालक मा. सुनील वारे, डॉ.भाग्यलक्ष्मी संचालिका डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था कर्नाटक, किसान जावळे जिल्हाधिकारी रायगड,श्री भरत बास्टेवाड मुख्य कार्यकरी अधिकारी जिल्हा परिषद रायगड , सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक रायगड,भंदन्त राहुल बोधी महाथेरो, नागसेन कांबळे,विभाग प्रमुख श्रीमती.स्नेहल भोसले, वृषाली शिंदे, उमेश सोनावणे, दादासाहेब गीते, शुभांगी पाटील आदी उपस्थित होते. महाराष्ट्र शासनच्या वतीने चवदार तळ्यातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पोलिसाच्या वतीने शासकीय मानवंदना देण्यात आली.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ऐतिहासिक महाड मध्ये चवदार तळे सत्याग्रह करून सर्वांसाठी पिण्याचे पाणी खुले केले. ही ऐतिहासिक घटना असून महाड मध्ये चवदार तळ्याच्या लढ्यातील आठवणीना उजाळा देण्यासाठी भीमसृष्टी उभारणार असून सामाजिक न्याय विभागाच्या वतीने भीमसृष्टीच्या कामाला निधीची कमतरता पडू देणार नसल्याची माहिती मा.ना.संजयजी शिरसाट मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांनी चवदार तळे वर्धापन दिनानिमित्त अभिवादन प्रसंगी पत्रकारांशी बोलताना दिली.
त्यानंतर मा.मंत्री.संजयजी शिरसाट आणि राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री मा. भरतशेठ गोगावले यांनी क्रांती स्तंभ तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास तसेच महाड मधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे संस्थेच्या वतीने ८५% सवलतीच्या दरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर व इतर महामानवाच्या सामाजिक समतेवर आधारित पुस्तक विक्री स्टॉलचे उद्घघाटन मा.मंत्री संजयजी शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले.
बार्टी तर्फे महाड चवदार तळे सत्याग्रहातील लढ्याचा इतिहास कन्नड, तेलगु, तमिळ, या भाषिक संकेत स्थळाचे उद्घघाटन मा.प्रधान सचिव डॉ.हर्षदीप कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी महाड चवदार तळे सत्याग्रहाला २०२७ साली १०० वर्ष पूर्ण होत असून हा इतिहास बार्टीच्या वतीने जनतेला उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मत व्यक्त केले.
या प्रसंगी डॉ.भाग्यलक्ष्मी मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले.प्रसिद्ध निवेदक दीपक मस्के यांनी केले.तसेच संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन सुमेध थोरात यांनी केले. विभाग प्रमुख स्नेहल भोसले यांनी आभार मानले.
तसेच हा कार्यक्रम पार पडण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापक सुमेध थोरात, नितीन सहारे ,नसरीन तांबोळी, डॉ.अंकुश गायकवाड, डॉ.संभाजी बिरांजे, सुनंदा गायकवाड.रामदास लोखंडे, विनायक भालेराव,गौतम शेवडे, फोटोग्राफर राहुल कवडे त्याचबरोबर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, महाड येथील प्र.व्यवस्थापक प्रकाश जमदाडे, जनसंपर्क अधिकारी लिना किर्तीकर व कर्मचारी वर्ग,स र्व समतादूत यांनी परिश्रम घेतले.
000