लाहोरमध्ये सकाळीच तीन शक्तिशाली स्फोट

स्फोट घडवून आणला कोणी हे अद्याप अस्पष्ट

लाहोरमध्ये सकाळीच तीन शक्तिशाली स्फोट

इस्लामाबाद: वृत्तसंस्था 

भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याच्या धक्क्यातून पाकिस्तान बाहेर आलेला नसतानाच आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास लाहोर शहरात तीन शक्तिशाली स्फोट झाले आहेत. हे स्फोट क्षेपणास्त्रचे असल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. मात्र, पाकिस्तानी लष्कर, सरकार किंवा पंजाब प्रांताचे सरकार यांच्याकडून आतापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती दिली गेली नसल्यामुळे या स्फोटांबाबत गोंधळाचे आणि भीतीचे वातावरण आहे. 

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने मंगळवार बुधवारच्या मध्यरात्री एक ते एक वाजून पंचवीस मिनिटं या कालावधीत क्षेपणास्त्र डागून पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मूकाश्मीरमधील नऊ ठिकाणी असलेले 21 दहशतवादी तळ उध्वस्त केले आहेत. या मोहिमेला भारताने ऑपरेशन सिंदूर असे समर्पक नाव दिले आहे. 

लाहोर मध्ये झालेले स्फोट नेमके कोणत्या ठिकाणी झाले, ते कोणी घडवून आणले, या स्फोटामुळे किती जीवित व वित्तहानी झाली, याची कोणतीही माहिती अद्याप उपलब्ध नसल्यामुळे त्यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत. हेच स्फोट म्हणजे भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरचा पुढचा भाग आहे की तहरीके तालिबान पाकिस्तान किंवा बलोच लिबरेशन आर्मी यांनी हा स्फोट घडवून आणला असावा, अशा चर्चा सुरू आहेत. खुद्द पाकिस्ताननेच भारताला बदनाम करण्याच्या दृष्टीने हे स्फोट घडवून आणले असावेत, असा तर्कही मांडला जात आहे. 

हे पण वाचा  '... ही तर मोदी, शहा, भाजपच्या राष्ट्रभक्तीची दिवाळखोरी'

About The Author

Advertisement

Latest News

भारत पाक सामन्यात दीड लाख कोटी रुपयांचा जुगार भारत पाक सामन्यात दीड लाख कोटी रुपयांचा जुगार
मुंबई: प्रतिनिधी पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवरून कर्ज मिळू नये यासाठी प्रयत्न करणाऱ्या केंद्र सरकारने ऐनवेळी कच खाऊन भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याला...
'मी दलाली, फसवणूक न करता प्रामाणिकपणे कमावतो पैसे'
मावळ तालुक्यात भात पिकावर किडीचा प्रादुर्भाव
स्थित्यंतर, राही भिडे | महिलांची घोडदौड पण अर्धीच!
सरकार आणि भाजपच्या भूमिकेत महिन्याभरात उलटफेर
'... ही तर मोदी, शहा, भाजपच्या राष्ट्रभक्तीची दिवाळखोरी'
जात प्रमाणपत्र न मिळाल्याने चिमुकल्यांच्या बापाची आत्महत्या

Advt