'प्रसंगी जीव देऊ पण वक्फ कायद्यातील सुधारणा... '

वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात विविध ठिकाणी निदर्शने

'प्रसंगी जीव देऊ पण वक्फ कायद्यातील सुधारणा... '

नवी दिल्ली: प्रतिनिधी

आपण प्रसंगी जीव देखील देऊ पण वक्फ कायद्यातील सुधारणा मान्य करणार नाही, असा इशारा सुधारणांना विरोध करणाऱ्या मुस्लिम समाजातील घटकांनी दिला आहे. वक्फ सुधारणा विधेयक लोकसभा आणि राज्यसभेने मंजूर केल्यानंतर त्याला विरोध करण्यासाठी देशभरात ठिकठिकाणी आंदोलने, निदर्शने केली जात आहेत. 

संसदेत वक्फ सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू असताना सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. सत्ताधाऱ्यांनी वक्फ बोर्डाच्या मालमत्तांच्या व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी आणि गरीब मुस्लिम समाजघटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सुधारणा आवश्यक असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला गेला तर वक्फ कायद्यातील सुधारणा हे मुस्लिम समाजाच्या अधिकारांवर अतिक्रमण आणि संविधानाचे उल्लंघन असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. 

आता विधेयक संमत झाल्यानंतर त्याला विरोध असणाऱ्या मुस्लिम समाजातील घटकांकडून रस्त्यावर उतरून आंदोलने केली जात आहेत. त्याचप्रमाणे या सुधारणांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचेे ही सांगितले जात आहे. कोलकाता येथे जॉईंट फोरम फॉर वक्फ प्रोटेक्शनच्या वतीने निदर्शने करण्यात येत आहेत. मुस्लिम लोक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरले आहेत. We Reject Bill असा मजकूर लिहिलेले फलक निदर्शकांच्या हाती आहेत. 

हे पण वाचा  वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत संमत

अहमदाबाद येथेही विधेयकाला विरोध करण्यासाठी तीव्र निदर्शने करण्यात येत आहेत. प्राण गेला तरी बेहत्तर, मात्र आम्ही वक्फ कायद्यातील सुधारणा मान्य करणार नाही, असा इशारा आंदोलकांकडून दिला जात आहे. 

पाटणा येथे वक्फ सुधारणा विधेयक मागे घेण्यासाठी प्राणही अर्पण करावा, असे आवाहन निदर्शकांकडून मुस्लिम समाजाला केले जात आहे. आम्ही आंदोलने, निदर्शने तर करूच पण या विधेयकाला पाठिंबा देणाऱ्याआरसी नितीश कुमार, जीनतराम मांझी यांचा सेक्युलर पक्ष आणि चिराग पासवान यांना धडा शिकवू, असा इशारा आंदोलकांकडून दिला जात आहे. 

तेलंगणा राज्याच्या वक्फ बोर्डाने तातडीची बैठक बोलवून वक्फ कायद्यातील सुधारणा नाकारण्याचा ठराव केला आहे. वक्फ कायद्यात प्रस्तावित असलेल्या 41 सुधारणा या मुस्लिम समाजासाठी घातक असून वक्फ बोर्डाच्या मालमत्ता हडप करण्याच्या उद्देशानेच या सुधारणा करण्यात येत आहेत, असा आरोप सुधारणांच्या विरोधात असलेल्यांकडून केला जात आहे. 

संसदेत वक्फ कायद्यातील सुधारणांना मान्यता मिळताच उत्तर प्रदेशातील पोलीस यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या सुधारणांना विरोध करण्यासाठी तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता लक्षात घेऊन अतिरिक्त पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. ड्रोन द्वारे संवेदनशील भागांची टेहळणी केली जात आहे. अराजकवादी तत्त्वांच्या विरोधात कठोरात gggकठोर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

About The Author

Advertisement

Latest News

बदल ही एकमेव गोष्ट आहे जी स्थिर राहते डॉ. सी.जयकुमार यांचे विचार! बदल ही एकमेव गोष्ट आहे जी स्थिर राहते डॉ. सी.जयकुमार यांचे विचार!
पुणे : बांधकाम क्षेत्र भारताच्या आर्थिक विकासाचा एक महत्वाचा आधारस्तंभ म्हणून उदयास येत असून जीडीपी आणि रोजगारात महत्वपूर्ण योगदान देत...
मंगेशकर रुग्णालयाचा 'बैल गेला अन् झोपा केला'
'नियम न पाळणाऱ्या रुग्णालयांची जागा ताब्यात घ्या'
'प्रसंगी जीव देऊ पण वक्फ कायद्यातील सुधारणा... '
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांच्या निधनाने देशभक्तीची ज्योत मनामनात प्रज्वलीत करणारे अभिनेते हरपले
'सजना'चे  मोहक पोस्टर आणि टिझर प्रेक्षकांच्या भेटीला
'मनसैनिकांवर कायदेशीर कारवाई करा'

Advt