ज्येष्ठ चित्रपट निर्माते सलीम अख्तर यांचे निधन

रुग्णालयात उपचार सुरू असतानाच मालवली प्राणज्योत

ज्येष्ठ चित्रपट निर्माते सलीम अख्तर यांचे निधन

मुंबई: प्रतिनिधी

ज्येष्ठ चित्रपट निर्माते सलीम अख्तर यांचे रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. मागील काही दिवसापासून प्रकृती असो असल्यामुळे त्यांना कोकिलबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. काही दिवस त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. काल रात्री उशिरा त्यांचे निधन झाले. 

सलीम अख्तर हे हिंदी चित्रपट सृष्टीतील यशस्वी निर्माते होते. 1980 आणि 90 या दशकात त्यांनी आफताब पिक्चर्सच्या माध्यमातूनअनेक लोकप्रिय चित्रपट दिले. त्यामध्ये  ‘चोरों की बारात’, ‘कयामत’, ‘लोहा’, ‘बटवारा’, ‘फूल और अंगारे’, ‘बाजी’, ‘इज्जत’ आणि ‘बादल’ यांचा समावेश आहे. 

राजा की आयेगी बारात या सन 1998 मध्ये प्रसिद्ध झालेल्या चित्रपटात सलीम अख्तर यांनी अभिनेत्री राणी मुखर्जीला प्रथम संधी दिली. त्यानंतर तिला मागे वळून पाहावे लागले नाही. त्याचप्रमाणे तमन्ना भाटिया हिला देखील त्यांनी चांद सा रोशन चेहरा या चित्रपटातून प्रथम संधी दिली. 

हे पण वाचा  आयपीएलमध्ये संदीप शर्माच्या नावावर लाजिरवाणा विक्रम

सलीम अख्तर यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपट सृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली असून मोठ्या प्रमाणावर हळहळ व्यक्त केली जात आहे.

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

 चाफेकर बंधुंचे स्मारक देशभक्तीचे संस्कार देणारे केंद्र चाफेकर बंधुंचे स्मारक देशभक्तीचे संस्कार देणारे केंद्र
चिंचवड येथील क्रांतीवीर चापेकर स्मारकाचे लोकार्पण  पिंपरी: प्रतिनिधी 'हुतात्मांच्या कार्यातून देशभक्तीची प्रेरणा मिळत असते. चापेकर बंधु अशाच हुतात्मांपैकी एक होते....
'भाषा शिकण्यावरून वाद हा रिकाम टेकड्यांचा उद्योग'
चाकणसह छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार टेस्लाचे उत्पादन
संग्राम थोपटे लवकरच होणार भाजपमध्ये डेरेदाखल
'... ही मागणी पांडुरंगाकडे करण्याचे कारणच नाही'
'वी द पीपल;'ने जागवल्या बहुजन महानायकांच्या स्मृती
माळशिरस तालुक्यात संपणार पाण्याचा वनवास

Advt