पोटोबा मंदिर परिसरात महिलेचे मंगळसूत्र चोरले

वडगाव मावळ पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल

पोटोबा मंदिर परिसरात महिलेचे मंगळसूत्र चोरले

वडगाव मावळ/प्रतिनिधी 

वडगाव मावळ येथील पोटोबा मंदिर परिसरात (दि १०) एप्रिल २०२५ रोजी एक जबरी चोरी घडली आहे. ज्योती लोकरे (वय ३५ वर्षे, गृहिणी, राहणार लक्ष्मी सोसायटी, दिग्विजय कॉलनी, वडगाव) यांनी ११ एप्रिल २०२५ रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 

घटनेचे तपशिलानुसार, १० एप्रिल २०२५‌ रोजी सायं. ७:३० वाजता पोटोबा मंदिराजवळ कीर्तनाचा कार्यक्रम संपल्यानंतर जेवणाच्या कार्यक्रमासाठी महिलांचे रांगेत उभी असताना, अनोळखी महिलेने (वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे, नाव व पत्ता माहित नाही)  ज्योती लोकरे यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र (१.५ तोळे वजनाचे) चोरून घेतले. ही घटना फिर्यादीच्या संमतीशिवाय झाली असून, आरोपीने मणी मंगळसूत्र ओढून घेतले. या चोरीमुळे फिर्यादीला १,००,००० रुपयांचे नुकसान झाले आहे. 

पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, आरोपीला शोधण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. 

हे पण वाचा  अन्य योजनांचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणीच्या निधीत कपात

याप्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार काळेकरीत आहे 

Tags:

About The Author

Satish Gade Picture

Correspondent, Vadgaon Maval

Advertisement

Latest News

विश्व हिंदू परिषद मावळ तालुका बजरंग दलाच्या वतीने वडगावात तहसिल कार्यालय मोर्चा विश्व हिंदू परिषद मावळ तालुका बजरंग दलाच्या वतीने वडगावात तहसिल कार्यालय मोर्चा
वडगाव मावळ/ प्रतिनिधी  पश्चिम बंगालमध्ये हिंदू समाजावर सातत्याने होणारे हल्ले, जाळपोळ, धार्मिक द्वेष भावना वाढविणारे प्रकार आणि शासन यंत्रणेचे अपयश...
फुले सिनेमा समाजप्रबोधन करणारा क्रांतिकारी सिनेमा ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
इंग्रजीला पालखी आणि हिंदीला विरोध हा कुठला विचार?
चाफेकर बंधुंचे स्मारक देशभक्तीचे संस्कार देणारे केंद्र
'भाषा शिकण्यावरून वाद हा रिकाम टेकड्यांचा उद्योग'
चाकणसह छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार टेस्लाचे उत्पादन
संग्राम थोपटे लवकरच होणार भाजपमध्ये डेरेदाखल

Advt