समता रॅली द्वारे बार्टीने महामानवास केले विनम्र अभिवादन!
संविधान जागृतीचा दिला संदेश
पुणे - डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे संस्थेच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त भारतीय संविधान अमृत महोत्सव समता सप्ताह निमित्त बार्टी संस्थेचे महासंचालक श्री सुनील वारे, निबंधक श्रीमती इंदिरा अस्वार यांच्या मार्गदर्शनाखाली ७एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रमाद्वारे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस विभागप्रमुख वृषाली शिंदे, यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
विभागप्रमुख रविंद्र कदम, उमेश सोनवणे, शुभांगी पाटिल, कार्यालय अधीक्षक डॉ संध्या नारखेडे, मुख्याध्यापक जयश्री चेडगे , प्रकल्प व्यवस्थापक नितीन सहारे, सुमेध थोरात, महेश गवई , डॉ सारिका थोरात, शुभांगी सुतार यांनीही अभिवादन केले. बार्टी मुख्यालय ते पुणे स्टेशन येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळया पर्यंत समता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या रॅलीत अधिकारी व कर्मचारी शासकीय सफाई कामगारांच्या मुला मुलांची निवासी शाळा येरवडा, येथील विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या वेशभूषेत सामाजिक समतेचा संदेश दिला.
या रॅलीत भारतीय संविधानाने दिलेले अधिकार व कर्तव्ये याची जागृती करण्यात आली. जिल्हाधिकारी पुणे कार्यालय समोरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन प्रकल्प व्यवस्थापक श्री सुमेध थोरात यांनी केले. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करण्यात आला.
याप्रसंगी बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी तसेच शासकीय कर्मचाऱ्यांच्या मुला मुलांची निवासी शाळा येरवडा , पुणे येथील विद्यार्थी, शिक्षक कर्मचारी विविध क्षेत्रातील मान्यवर भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन श्री रामदास लोखंडे यांनी केले.
आभार जनसंपर्क अधिकारी स्तुती दैठणकर यांनी मानले.
000