डॉ. आंबेडकर यांची जयंती आरपीआयच्या वतीने उत्साहात साजरी
विविध पक्षांच्या मान्यवरांनी अर्पण केली मानवंदना
पुणे: प्रतिनिधी
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पुणे स्टेशन येथील पुतळ्यास प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला व अभिवादन करण्यात आले.
मानवंदना देण्यास येणाऱ्या भीम अनुया्यांना रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पंधराशे किलो व्हेज पुलाव, पाचशे किलो लाडू, पाणी बॉटल व देशी झाडाची रोप वाटप करण्यात आली. राज्याचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले, मंत्री मा. माधुरी ताई मिसाळ, मा. आमदार जयदेव रंधवे व अनेक पक्षाचे, संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, शहराध्यक्ष संजय सोनवणे, शैलेंद्र चव्हाण, अशोक कांबळे, अशोक शिरोळे, रोहिदास गायकवाड, संघमित्रा गायकवाड, बाबूराव घाडगे, शाम सदाफुले, वसंत बनसोडे, महेंद्र कांबळे, महीपाल वाघमारे, शोभा झेंडे, निलेश रोकडे, सुन्नाबी शेख, रावसाहेब झेंडे, अतुल भालेराव, रमेश तेलवडे, अयुब जाहगीरदार, लियाकत शेख, भगवान गायकवाड, चिंतामन जगताप, शशिकांत मोरे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे हे सातवे वर्ष असून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, संजय सोनवणे, अशोक कांबळे, शैलेंद्र चव्हाण, शाम सदाफुले, निलेश रोकडे यांनी प्रयत्न केले.