ओबीसी विद्यार्थ्यांच्या परदेशी शिक्षणासाठीच्या शिष्यवृत्तीसाठी शासनाने अर्ज मागविले!
१७ मे २०२५ पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत!
परदेशी विद्यापीठात शिकण्याचा व जाण्या येण्याचा सर्व खर्च महाराष्ट्र शासन देणार, पात्र ओबीसी विद्यार्थ्यांना लाभ घेण्याचे महाज्योतीचे माजी संचालक प्रा. दिवाकर गमे यांचे आवाहन !
महाराष्ट्रामधे एससी एसटी विद्यार्थ्यांप्रमाणेच ओबीसी विद्यार्थ्यांनाही शिक्षणासाठी सर्वप्रकारच्या शिष्यवृत्ती मिळाव्यात, अशी मागणी , राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री, ओबीसींचे नेते छगनराव भुजबळ यांनी केली होती, त्यासाठी त्यांनी सतत पाठपुरावा केल्यामुळे, २९ मे २००३ पासुन ओबीसी विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या शैक्षणिक शिष्यवृत्त्या मिळत आहेत. त्याचाच एक भाग म्हणुन, छगनराव भुजबळ यांच्या प्रयत्नामुळे, ओबीसी विजेएनटी व एसबीसी विद्यार्थ्यांसाठी सुध्दा, २०१८ च्या शासन निर्णयाप्रमाणे, गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकीत विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी, ओबीसी विभागाची ही परदेशी शिष्यवृत्ती सुरू झालेली आहे. सुरूवातीला ही संख्या फक्त १० विद्यार्थी एवढीच होती. पण भुजबळ साहेबांनी तत्कालीन मंत्रीमंडळात हा विषय सातत्याने लावुन, ती संख्या ७५ केलेली आहे, आता सुध्दा ती संख्या अजुन वाढवुन, किमान १५० करावी असा आग्रह आहे. यामधे मुलींसाठी ३० टक्के जागा आरक्षित आहे.
अशा परदेशी शिष्यवृत्तीची जाहीरात नुकतीच महाराष्ट्र शासनाच्या, पुणे येथील, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे संचालक ज्ञानेश्र्वर खिल्लारे यांचे स्वाक्षरीने, प्रसिध्द झालेली आहे. परदेशी शिष्यवृत्तीसाठी, राज्यातील ओबीसी विजेएनटी व एसबीसी विद्यार्थ्यांचे अर्ज मागीतले असुन त्याची १७ मे २०२५ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असुन, १७ एप्रिल २०२५ पासुन शासनाच्या वेबसाईटवर शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचा फार्म उपलब्ध करण्यात येईल. इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी, सदर फार्म डावूनलोड करून, तो भरून, प्रत्यक्ष संचालक ईतर मागास बहूजन कल्याण विभाग, पुणे यांचे कार्यालयात स्वता नेवून द्यावा, किंवा, १७ तारखेपर्यंत पोचेल, अशा अवधीत तो पोस्टाने पाठविण्यात यावा, असे जाहीरातीमधे नमुद केलेले आहे.
या परदेशी शिष्यवृत्ती चा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी ओबीसी विजेएनटी व एसबीसी या प्रवर्गातील असावा व तो महाराष्ट्र राज्याचा कायम रहिवाशी असावा. विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 35 वर्षे तर पीएचडी अभ्यासक्रमासाठी 40 वर्षे ही कमाल वयोमर्यादा असेल. शिष्यवृत्ती द्यावयाच्या एकूण जागेपैकी 30% जागा या मुलींसाठी राखीव आहेत एकाच कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलांना परदेशी शिष्यवृत्ती चा लाभ घेता येईल. विवाहित महिला उमेदवारांसाठी पतीकडील कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न दाखविणे आवश्यक आहे. भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठामधून पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी पदवी परीक्षेत व पीएचडीसाठी पदवीधर परीक्षेत किमान 55 टक्के गुण असते आवश्यक आहे. परदेशातील शिक्षण संस्था ही जागतिक क्रमवारी युनिव्हर्सिटी रँक 200 च्या आत असावी.( सन 2025 ची टीव्हीएस रेटिंग) अशा प्रकारच्या व ईतव अटी व पात्रता दिलेल्या आहेत.
इच्छुक विद्यार्थ्यांनी www.maharashtra.gov.in किंवा www.obcbahujankayan.maharashtra.gov.in या वेबसाईटवरून दिनांक १७ एप्रिल २०२५ पासुन हा अर्ज डाऊनलोड करून तो परिपूर्ण व आवश्यक त्या कागदपत्रासह दिनांक १७ मे २०२५ पर्यंत सायंकाळी सव्वा सहा वाजेपर्यंत समक्ष किंवा पोस्टाने इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, आकार प्रिमायसेस, दुसरा मजला एमएचबी कॉलनी, माढा कमर्शिअल कॉम्प्लेक्स समतानगर ,येरवडा पुणे ४११००६ “. येथे दोन प्रति मधे सादर करावा.
तरी ओबीसी विजेएनटी व एसबीसी प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थी विद्यार्थींनींना आवाहन करण्यात येते की, त्यांनी परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ घेवुन ,उच्च शिक्षण घेण्यासाठी शासनाच्या ओबीसी विभागाच्या या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा. असे आवाहन महाज्योतीचे माजी संचालक प्रा, दिवाकर गमे यांनी केले आहे.सर्व ओबीसी हितचिंतकांनी, ओबीसी संघटनांनी, ही माहीती ओबीसी विद्यार्थ्यांपर्यंत पोचवावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
000