इंग्रजीला पालखी आणि हिंदीला विरोध हा कुठला विचार?

हिंदी शिकण्याच्या सक्तीबाबत मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट मत

इंग्रजीला पालखी आणि हिंदीला विरोध हा कुठला विचार?

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील शाळांमध्ये मराठीप्रमाणेच हिंदी शिकण्याची सक्ती करण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेप्रमाणेच अनेक साहित्यिकांनी देखील विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. इंग्रजी भाषेला पालखी आणि हिंदी भाषेला विरोध हा कुठला विचार आहे, असा परखड सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

हिंदी भाषेची सक्ती करण्याबाबत आपण यापूर्वीच आपले मत व्यक्त केले आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा शिकलीच पाहिजे. त्याचप्रमाणे देशभरात संवादाचे एक सूत्र निर्माण करण्यासाठी हिंदी भाषा ही शिकली पाहिजे ही भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच स्पष्ट केली आहे. 

नवीन शैक्षणिक धोरणानुसार पहिल्या इयत्तेपासून हिंदी शिकणे अनिवार्य करण्यात आले आहे. शैक्षणिक वर्ष 2025- 26 पासून महाराष्ट्रात या धोरणाचा अवलंब केला जाणार आहे. मात्र, हिंदी भाषेच्या सक्तीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध व्यक्त केला आहे. या सक्तीच्या विरोधात टोकाचा संघर्ष करण्याचा इशारा मनसेने दिला आहे. 

हे पण वाचा  माळशिरस तालुक्यात संपणार पाण्याचा वनवास

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली आहे. मराठी भाषेला अन्य कोणत्या भाषेचा धोका नाही. मात्र, गुजराथी भाषेपासून मराठीला धोका आहे, असे ते म्हणाले. 

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

विश्व हिंदू परिषद मावळ तालुका बजरंग दलाच्या वतीने वडगावात तहसिल कार्यालय मोर्चा विश्व हिंदू परिषद मावळ तालुका बजरंग दलाच्या वतीने वडगावात तहसिल कार्यालय मोर्चा
वडगाव मावळ/ प्रतिनिधी  पश्चिम बंगालमध्ये हिंदू समाजावर सातत्याने होणारे हल्ले, जाळपोळ, धार्मिक द्वेष भावना वाढविणारे प्रकार आणि शासन यंत्रणेचे अपयश...
फुले सिनेमा समाजप्रबोधन करणारा क्रांतिकारी सिनेमा ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
इंग्रजीला पालखी आणि हिंदीला विरोध हा कुठला विचार?
चाफेकर बंधुंचे स्मारक देशभक्तीचे संस्कार देणारे केंद्र
'भाषा शिकण्यावरून वाद हा रिकाम टेकड्यांचा उद्योग'
चाकणसह छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार टेस्लाचे उत्पादन
संग्राम थोपटे लवकरच होणार भाजपमध्ये डेरेदाखल

Advt