BARTI NEWS | संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बार्टीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश!

BARTI NEWS | संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बार्टीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश!

डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे या महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या स्वायत्त संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी संघ लोकसेवा आयोग (युपीएससी) मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे पूर्व प्रशिक्षण देण्यात येते. तसेच मुख्य परीक्षा व मुलाखत चाचणीकरिता पात्र झालेल्या उमेदवारांना आर्थिक साहाय्य दिले जाते.

दिनांक २२/०४/२०२५ रोजी लागलेल्या संघ लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या नागरी सेवा २०२४ परीक्षेच्या निकालात बार्टीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.

या निकालात बार्टी संस्थेच्या एकूण ११ विद्यार्थ्यांची निवड झाली असून विद्यार्थ्यांना खालील प्रमाणे रँक मिळाल्या आहेत...

1. आयुष राहुल कोकाटे - रँक ५१३
2. बुलकुंडे सावी श्रीकांत - रॅंक ५१७
3. प्रांजली खांडेकर - रॅंक ६८३
4. राजूरकर अतुल अनिल- रँक ७२७
5. खंदारे मोहिनी प्रल्हाद - रॅंक ८४४
6. सरवदे अजय नामदेव - रॅंक ८५८
7. अभिजय पगारे - रॅंक ८८६
8. पानोरेकर हेमराज हिंदुराव - रॅंक ९२२
9. बोराडे प्रथमेश सुंदर - रॅंक ९२६
10. जाधव सुमेध मिलिंद - रॅंक ९४२
11. सदावर्ते आनंद राजेश - रॅंक ९४५

हे पण वाचा  मावळात निर्माण केला लोकाभिमुखतेचा नवा आदर्श

कठोर मेहनत, योग्य मार्गदर्शन आणि संसाधनांचा प्रभावी वापर यांच्या जोरावर त्यांनी हे अत्युच्च यश संपादन केले आहे. यूपीएससी परीक्षा देशातील सर्वात अवघड परीक्षांपैकी एक मानली जाते आणि त्यामधील  यश ही अतिशय उल्लेखनीय बाब आहे.

बार्टीच्या महासंचालक सुनील वारे यांनी सांगितले की, “संस्थेच्या माध्यमातून सामाजिकदृष्ट्या मागास वर्गातील विद्यार्थ्यांना गुणवत्ता आणि कौशल्यवृद्धीच्या दिशेने चालना देण्याचे काम आम्ही सातत्याने करत आहोत. यंदाचे युपीएससी मधील विद्यार्थ्यांचे यश हे संस्थेच्या प्रयत्नांची फलश्रुती आहे.”

केंद्रीय सेवांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी समाजातील विध्यार्थ्यांसाठी आदर्श निर्माण केला आहे. बार्टीने त्यांच्या यशाचे औचित्य साधून भविष्यातील विद्यार्थ्यांसाठी अधिक व्यापक आणि सुसज्ज प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करण्याचे संकेत दिले आहेत.

सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ हर्षदीप कांबळे यांच्या मार्गदर्शखाली व सामाजिक न्याय विभागाच्या या पुढाकारामुळे अनेक विद्यार्थी सशक्त होत असून, समतेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून या उपक्रमाची दखल देशभरात घेतली जात आहे.

 सुनील वारे, महासंचालक बार्टी व निबंधक इंदिरा अस्वार यांनी या निकालात 11 विद्यार्थ्यांची निवड झाल्याबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थी, यूपीएससी विभाग प्रमुख शुभांगी पाटील व त्यांच्या टीमचे विशेष अभिनंदन केले.

000

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

Advt