डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त संयुक्त अभिवादन
यावर्षी प्रथमच मध्यवर्ती समितीकडून सर्वपक्षीय समारंभाचे आयोजन

पुणे : प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 134 व्या जयंती निमित्त पुणे ससून हॉस्पिटल समोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ 14 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता सर्वपक्षीय व सर्वसमावेशक संयुक्त अभिवादन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे.
यंदाच्या वर्षी प्रथमच भीमजयंती मध्यवर्ती समितीच्या वतीने आयोजित संयुक्त अभिवादन कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार , केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासह अन्य प्रशासकीय अधिकारी, पुणे शहरांमधील सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच सर्व पक्षांचे शहराध्यक्ष व मान्यवर यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.
यावेळी आंबेडकरी चळवळीतील सर्व पक्ष संघटनांचे नेते व आजी-माजी लोकप्रतिनिधी हे देखील अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच एका मंचावर उपस्थित राहून अभिवादनासाठी येणाऱ्या सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कार करणार आहेत.
सदर कार्यक्रमाचे आयोजन मध्यवर्ती समितीचे राहुल डंबाळे, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, रिपाई नेते परशुराम वाडेकर व रिपब्लिकन युवा मोर्चाच्या सुवर्णा डंबाळे यांचेकडून करण्यात आले आहे.
About The Author
Latest News
