मानव एकता दिवस - निष्काम सेवेचा अनुपम संकल्प

संत निरंकारी मिशन आयोजित रक्तदान शिबिरामध्ये ६९७ रक्तदात्यांचे रक्तदान

मानव एकता दिवस - निष्काम सेवेचा अनुपम संकल्प

पिंपरी: प्रतिनिधी         

प्रेम आणि बंधुभावना जागविणारा ‘मानव एकता दिवस’, संत निरंकारी मिशन द्वारे दरवर्षी २४ एप्रिल रोजी बाबा गुरबचनसिंहजी यांच्या पावन स्मृतिप्रित्यर्थ श्रद्धा आणि भक्तिभावनेने परिपूर्ण वातावरणात आयोजित केला जातो. हा दिवस केवळ पुण्यस्मरण करण्याचा प्रसंग नसून मानवता, सौहार्द आणि एकत्वाच्या भावनांचा एक आत्मिक संगम आहे. 

मानव एकता दिवसाच्या या प्रसंगी मिशन कडून देशभर रक्तदानाच्या एका प्रेरक श्रृंखलेचा शुभारंभ होतो जी नि:स्वार्थ सेवाभावनेच्या सामूहिक जागृतीचे स्वरूप बनून संपूर्ण वर्षभर समाजामध्ये प्रवाहित होत राहते. त्याचबरोबर सत्संग कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रेम, शांती आणि समरसतेचा प्रकाश देखील जनसामान्यांपर्यंत पोहचविला जातो.  

यावर्षी सुद्धा संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन मार्फत पूर्ण भारतवर्षात सुमारे ५००हून अधिक शाखांमध्ये भव्य रक्तदान शिबिरांची अखंड श्रृंखला आयोजित करण्यात आली. संत निरंकारी सत्संग भवन, दिघी रोड, भोसरी येथे २४ एप्रिल २०२५ रोजी करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये ६९७ मिशनच्या अनुयायांनी निस्वार्थ भावनेने रक्तदान केले त्याचबरोबर समाजातील अनेक सज्जनांनी उत्साह आणि समर्पण भावनेने स्वेच्छा रक्तदान करुन मानवकल्याणामध्ये आपला सहयोग दिला. वाय.सी.एम. रुग्णालय रक्तपेढी यांनी २१६ युनिट, ससून रुग्णालय रक्तपेढी यांनी १०१ युनिट, संत निरंकारी रक्तपेढी यांनी ३८० युनिट रक्त संकलन करण्याचे कार्य केले.  

हे पण वाचा  मुंबई पोलीस दलात आर्थिक गुप्तवार्ता कक्ष स्थापन

युगप्रवर्तक बाबा गुरबचनसिंहजी यांनी सत्यबोधाच्या माध्यमातून समाजाला समाज अंधश्रद्धा व अनिष्ठ प्रथांपासून मुक्त करुन नशमुक्ती, साधे विवाह आणि युवावर्गाला सकारात्मक विचारांशी जोडणे यांसारख्या लोककल्याणकारी अभियानाची प्रेरक सुरवात केली. त्यांचे पावन मार्गदर्शन पुढे चालवत बाबा हरदेवसिंहजी यांनी “रक्त नाड्यांमध्ये वाहावे, नाल्यांमध्ये नको” हा अमर संदेश देऊन रक्तदानाला मिशनच्या आध्यात्मिक सेवेचे अभिन्न अंग बनवले. हा संदेश आजदेखील प्रत्येक निरंकारी भक्ताच्या हृदयामध्ये सेवा आणि समर्पणाची प्रेरक ज्योत बनून तेवत आहे.

हा दिवस चाचा प्रतापसिंहजी यांच्यासह त्या सर्व समर्पित बलिदानी संतांच्या पुण्य स्मृतिचे प्रतीक आहे, ज्यांनी मानव एकता, निःस्वार्थ सेवा आणि आध्यात्मिक जागृतीच्या मार्गावर चालत असताना आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. मानव एकता दिवस त्याच संतांचा दृढविश्वास व दृढसंकल्पाची प्रेरणा जिवंत करतो.

आरोग्य तपासणी, स्वच्छतेची विशेष काळजी आणि रक्तदात्यांसाठी उत्तम जलपान व्यवस्था या बाबींनी या सेवेला आणखी व्यवस्थित व कौतुकास्पद बनवले. हे महाअभियान केवळ रक्तदान नसून सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांचा करुणा, सेवा आणि एकत्वाचा संदेश जीवनात उतरविण्याचे सजीव माध्यम आहे जे आम्हाला शिकवते, की मानवता हाच सर्वोच्च धर्म होय. याच प्रेरणेने युक्त संत निरंकारी मिशन, सेवा आणि समर्पणाच्या पथावर निरंतर मानवतेचा मार्ग प्रशस्त करत आहे.

About The Author

Advertisement

Latest News

Advt