'वैद्यकीय व्यवसायावर शासकीय नियंत्रण लागू करावे'

शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंद गोयल यांची मागणी 

'वैद्यकीय व्यवसायावर शासकीय नियंत्रण लागू करावे'

पुणे: प्रतिनिधी 

सध्याच्या काळात वैद्यकीय व्यवसाय हा सेवा राहिलेला नाही. त्याला धंदेवाईक स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे गरीब रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गळचेपी होत आहे. ही बाब टाळण्यासाठी वैद्यकीय व्यवसायावर केंद्र आणि राज्य शासनाचे निर्बंध लागू करून त्याच्यावर नियंत्रण प्रस्थापित करावे, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंद गोयल यांनी केली आहे. 

सध्या खाजगी आणि धर्मादाय रुग्णालयांचा कारभार हा शासकीय रुग्णालयांपेक्षाही वाईट पद्धतीने सुरू असल्यामुळे यात सरकारने हस्तक्षेप करावा, अशी त्यांची मागणी आहे. 

खाजगी रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात आलेल्या रुग्णाकडून डॉक्टरांनी किती शुल्क घ्यावे, यावर कोणाचेच नियंत्रण नाही. त्यामुळे डॉक्टरांकडून 200 ते 2 हजार असे मनमानी शुल्क आकारले जाते. त्यामुळे बाह्यरुग्ण विभागात शुल्क आकारण्याबाबत सरकारने नियम लागू करावेत, अशी अपेक्षा गोयल यांनी व्यक्त केली.

हे पण वाचा   हास्य, टाळ्या, स्पर्धा, बक्षिसे आणि स्त्रीशक्तीचा जागर

खाजगी रुग्णालयांमध्ये धर्मादाय असले तरी देखील महात्मा फुले योजना, शहरी गरीब योजना, मुख्यमंत्री मदत निधी अशा रुग्णांना उपयुक्त असलेल्या योजनांची माहिती दिली जात नाही. या योजनांच्या मदतीने दाखल पाहणाऱ्या रुग्णांना शक्यतो टाळण्याकडे रुग्णालय प्रशासनाचा कल असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशा योजनांची माहिती असलेले फलक रुग्णालयांच्या दर्शनी भागात लावण्यात यावे. रुग्णालयात किती खाटांची क्षमता आहे, किती रुग्ण उपचार घेत आहेत, किती खाटा उपलब्ध आहेत, याची माहिती देखील रुग्णालयाच्या वेबसाईट व फलकांच्या माध्यमातून वेळोवेळी अद्ययावत करून रुग्णाच्या नातेवाईकांना देण्यात यावी, असेही गोयल म्हणाले. 

एकच डॉक्टर वेगवेगळ्या खाजगी रुग्णालयांमध्ये सेवा देत असल्याने त्यांच्याकडून वेळ पाळली जात नाही. त्याचा त्रास रुग्णांना सहन करावा लागतो. त्यामुळे स्वतःचा दवाखाना थाटून देखील इतर रुग्णालयांमध्ये सेवा देणाऱ्या डॉक्टरांवर देखील शासकीय निर्बंध असणे गरजेचे आहे, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

About The Author

Advertisement

Latest News

ईडी कार्यालयाला लागलेल्या आगीत महत्त्वाचे पुरावे नष्ट ईडी कार्यालयाला लागलेल्या आगीत महत्त्वाचे पुरावे नष्ट
मुंबई: प्रतिनिधी  सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या चौथ्या मजल्यावरील कार्यालयाला आग लागल्याने अनेक महत्त्वाच्या प्रकरणांची कागदपत्रे आणि पुरावे नष्ट झाल्याची भीती...
हजारो पाकिस्तानी नागरिकांना सौदीने नाकारले
पाकिस्तानात पसरले भीतीचे वातावरण
'वैद्यकीय व्यवसायावर शासकीय नियंत्रण लागू करावे'
'पाकिस्तानला भारताकडून दिले जाईल सडेतोड उत्तर'
'... ही दोन धर्मांची नव्हे तर धर्म आणि अधर्माची लढाई'
शिवसेनेच्या वतीने जळीतग्रस्त कुटुंबांना मदत

Advt