हजारो पाकिस्तानी नागरिकांना सौदीने नाकारले
केवळ 26 टक्के यात्रेकरूंना हजला जाण्यासाठी परवानगी
रियाध: वृत्तसंस्था
पहलगाम हल्ल्यानंतर जगभरात पाकिस्तानची छी थू होत असतानाच सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या साठ हजाराहून अधिक नागरिकांना हजी यात्रेला जाण्यासाठी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे आपल्याच नागरिकांसमोर मान खाली घालण्याची पाळी पाकिस्तानवर आली आहे.
जगभरातील मुस्लिमांसाठी महत्त्वाची असलेल्या हज यात्रेची तयारी सुरू असताना सौदी अरेबियाने पाकिस्तानला धक्का दिला आहे. पाकिस्तानातून 90 हजार 830 यात्रे करू हजला जाण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र, सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या केवळ 23 हजार 620 यात्रेकरूंना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. अर्थात, तब्बल 67 हजार 210 पाक नागरिकांना यात्रेला जाण्याची परवानगी मिळालेली नाही.
आधीच आर्थिक दृष्ट्या कंगाल अवस्थेत असलेल्या पाकिस्तान सरकारला हजच्या यात्रेकरूंसाठी कोणत्याही सोयी आणि सवलती यावर्षी देता आलेल्या नाहीत. त्यामुळे पाकिस्तान सरकारचे नाक आधीच कापले गेले आहे. त्यातच स्वखर्चाने यात्रेला जाण्याची तयारी असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना सौदी अरेबियाने बंदी घातल्यामुळे पाकिस्तान सरकार चांगलेच कोंडीत सापडले आहे.