वडगाव नगरपंचायत स्वागत कमानीवरील नाव बेकायदेशीर असल्याची नागरीकांची मागणी

वडगाव नगरपंचायत प्रशासनाचा मनमानी कारभार; नागरीकांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन;

वडगाव नगरपंचायत स्वागत कमानीवरील नाव बेकायदेशीर असल्याची नागरीकांची मागणी

वडगांव मावळ/प्रतिनिधी 

वडगाव नगरपंचायत हद्दीतील मुख्य रस्त्यावर उभारण्यात आलेली स्वागत कमानीवर जे नाव टाकण्यात आले आहे ते नाव बेकायदेशीर असल्याचा नागरीकांचा आरोप आहे. याबाबत नगरपंचायत प्रशासनाने कोणत्याही प्रकारचा ठराव घेतला नाही. नागरिकांना विश्वासात घेतले गेले नसल्याने कमानी वरील नाव काढण्याची मागणी नागरिकांनी केली आहे .याबाबत वडगांव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तथा प्रशासक प्रवीण निकम यांना लेखी निवेदन देण्यात आले.  

यावेळी बाळासाहेब  ढोरे, किसनराव वहिले, प्रकाशराव कुडे, राजेंद्र कुडे, पंढरीनाथ ढोरे, मयुर प्र. ढोरे,  बापुसाहेब वाघवले, मनोज खं. ढोरे, चंदुकाका ढोरे राहुल ढोरे, अर्जुन ढोरे, आबा चव्हाण, सुरेश जांभूळकर, राजेंद्र वहीले, भाऊसाहेब तु. ढोरे, बाळासाहेब तुमकर, सुनील कोद्रे, नितीन चव्हाण, सचिन कडू, सागर ढोरे, गणेश अ. ढोरे, अमोल ढोरे यांच्यासह इतर नागरिकांनी स्वागत कमानी वरील नाव काढण्याची मागणी केली आहे.

निवेदनात मध्ये असे म्हणाले आहे की आम्ही वडगावचे नागरिक असुन, वडगाव नगरपंचायत हददीतील वडगाव नगरपंचायतची स्वागत कमान हि जुना मुंबई-पुणे रस्ता राष्ट्रीय माहामार्ग १२६ यावर उभी आहे हि स्वागत कमान वडगाव गावाच्या पूर्वेस, वडगाव फाटा म्हणजे गावातील अक्षय हॉटेल या ठिकाणी आहे. आता वडगाव नगरपंचायत कमान मुळ स्टक्चर मध्ये व स्वागत कमानीवरील नावात बदल करण्यात आले आहे.

हे पण वाचा  छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी

याबाबत गावातील ग्रामस्थांना याबाबत कोणतीही पुर्व माहिती नाही. सदर वडगाव ग्रामस्थांचा व आमचा असा आरोप आहे कि, संबधित अधिकारी यानी मनमानी कारभार करून कोणतीही निविदा प्रकिया न करता, आर्थिक व फायदयासाठी देवाणघेवाण करून वडगाव नगरपंचायत स्वागतकमानमध्ये फेरबदल करून वडगांव नगरपंचायत स्वागत कमानीवरील नावात देखील बदल करण्यात आला आहे असे दिसत आहे. वडगाव नगरपंचायतने स्वागत कमानीवरील नावा बदल करण्यास कोणता ठराव अथवा परवानगी घेतली नाही या सर्व बाबींची माहीती वडगावचे नागरिक म्हणून नागरिकांना देण्यात आलेली नाही.

आमच्या निदर्शनात वडगाव नगरपंचायतने खालीलपैकी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली नाही असे दिसत आहे.

१) नगरपंचायत कमान व नावातबदल करण्यात आलेला ठराव

२) अदाज प्रत्रक

३) टी एस तांत्रिक मंजुरी

४) संबधित कामाची निविदा वर्तमानपत्रात दिलेली जाहीरात

५) नगरपंचायतने यावार केलेला खर्च माहीती

६) संबधित ठेकेदाराची माहीती

वडगाव नगरपंचायतकडे याची माहीती विचारणा केली असता सार्वजनिक बाधकाम विभागाकडे जाऊन विचारणा करा अशी सारवासारव उत्तरे देत आहेत परंतु ही वडगाव नगरपंचायत स्वागत कमान वडगाव ग्रुपग्रामपंचायत बरखास्त झाली व त्यानंतर वडगाव नगरपंचायत स्थापनेनंतर यावर वडगाव नगरपंचायतने खर्च केला आहे अशी माहीती मिळत आहे त्यामुळे वडगाव नगरपंचायत स्वागतकमान यावर पुर्ण अधिकार हा वडगाव नगरपंचायतचाच आहे वडगावचे ग्रामस्थ म्हणून आमचा असा आरोप आहे कि यामध्ये कुठेतरी वडगाव नगरपंचायत संबंधित काही स्थानिकांना हाताशी धरून वडगाव नगरपंचायत स्वागतकमानी वरील नावात बदल करून, आर्थिक घोटाळा व भ्रष्टाचार केला आहे.

यावेळी वडगांव नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी आपण यामध्ये लक्ष घालून संबधित अधिकारी याच्यावर योग्य ती कारवाई करून वडगाव नगरपंचायत स्वागत कमान पूर्ववत करावी अशा ग्रामस्थांनी सांगितले आहे.

यावेळी वडगांव नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी प्रवीण निकम यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पत्र व्यवहार करू योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले.

वडगांव ग्रामस्थांनी सांगितले की पुर्वेकडील कमानीला ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज यांचे नाव देण्यात यावे व पश्चिमेस असलेल्या कमानीला श्रीमंत सरदार महाजी शिंदे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.

Tags:

About The Author

Satish Gade Picture

Correspondent, Vadgaon Maval

Advertisement

Latest News

वडगाव नगरपंचायत स्वागत कमानीवरील नाव बेकायदेशीर असल्याची नागरीकांची मागणी वडगाव नगरपंचायत स्वागत कमानीवरील नाव बेकायदेशीर असल्याची नागरीकांची मागणी
वडगांव मावळ/प्रतिनिधी  वडगाव नगरपंचायत हद्दीतील मुख्य रस्त्यावर उभारण्यात आलेली स्वागत कमानीवर जे नाव टाकण्यात आले आहे ते नाव बेकायदेशीर असल्याचा...
पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदी संदीपसिंह गिल्ल यांची नियुक्ती
लाडकी बहिण योजनेचा श्रेयवाद महायुतीत सुरूच?
अधिकाधिक असंघटित कामगारांना ई श्रमिक कार्ड देणार: चॅटर्जी
छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी
पाकिस्तानप्रमाणेच बीडमध्ये राबवा 'ऑपरेशन सिंदूर'
स्वबळ की महायुती? भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता

Advt