संभाजीनगर मध्ये संविधान गौरव सोहळ्याचे आयोजन

बार्टीतील यूपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा होणार सन्मान

संभाजीनगर मध्ये संविधान गौरव सोहळ्याचे आयोजन

पुणे: प्रतिनिधी

डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे संस्थेच्या वतीने भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथील संत एकनाथ सभागृह येथे दिनांक ९ मे २०२५ रोजी संविधान गौरव संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून उद्घघाटन संजय शिरसाट, मंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तथा पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर यांच्या हस्ते   होणार असून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ  हर्षदीप कांबळे, समाज कल्याणचे आयुक्त श्री ओम प्रकाश बकोरिया , बार्टीचे महासंचालक श्री सुनील वारे  , संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

भारतरत्न डॉ  बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाद्वारे या देशातील नागरिकांना  संविधानिक हक्क व अधिकार बहाल केले.

बार्टी संस्था ही डॉ  बाबासाहेब आंबेडकर यांचा सामाजिक समतेचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच भारतीय संविधानाचा प्रसार व प्रचार करणारी अत्यंत महत्त्वपूर्ण संस्था असून  अनुसूचित जातीच्या उत्थानासाठी काम करते. तसेच विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व शिष्यवृत्ती देऊन विद्यार्थ्यांना घडवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करते. बार्टीतील अनेक विद्यार्थी हे भारतीय प्रशासकीय सेवा व महाराष्ट्र सेवेत कार्यरत असुन नुकतेच बार्टीतील ११ विद्यार्थी यूपीएससी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले  तसेच विविध स्पर्धा  परिक्षांमध्ये  उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मा मंत्री महोदय यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

हे पण वाचा  विधानसभेतून  सर्वसामान्य जनतेच्या हिताला प्राधान्य देणार

बार्टी  संस्थेमार्फत आयोजित  संविधान गौरव संमेलनास मोठ्या संख्येने  बार्टीतील तसेच सामाजिक न्याय विभागातील अधिकारी व कर्मचारी व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन  बार्टी संस्थेचे महासंचालक श्री सुनील वारे यांनी केले आहे.

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

Advt