सावित्रीबाई फुले आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालयाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे ~ डिप्रेस्ड क्लास मिशन सोसायटी ऑफ इंडिया या शिक्षण महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या सावित्रीबाई फुले आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाचे पुण्यातील पिसोळी येथे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.सावित्रीबाई फुले महाविद्यालयाची चार मजली सुंदर इमारत तीन वर्षात उभारण्यात आली.या महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनासाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत.
रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत ज्येष्ठ नेते एम डी शेवाळे यांच्या प्रेरणेतून त्यांचे सुपुत्र विशाल शेवाळे यांनी सावित्रीबाई फुले महाविद्यालय उभारले असल्याचे कौतुक केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी विशाल शेवाळे यांचे केले.यावेळी केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या पत्नी सौ सीमाताई आठवले तसेच रिपब्लिकन पक्षाचे परशुराम वाडेकर; असित गांगुर्डे ; पुणे शहर अध्यक्ष संजय सोनवणे शैलेश चव्हाण आणि महिपाल वाघमारे;आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.संयोजक विशाल शेवाळे आणि त्यांच्या पत्नी सौ काजल शेवाळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
000