दहशतीचे राजकारण करणाऱ्यांच्या विरोधात ठामपणे आवाज उठवणार!
आमदार रोहित पवार यांचे जयकुमार गोरे यांना प्रतिउत्तर
सातारा : कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद असतानाही राज्याच्या प्रश्नात लक्ष न घालता जिल्ह्यात बसून कुरबुरीचे राजकारण करायचे आणि दहशतीचे राजकारण शासकीय यंत्रणेला हाती धरून करायचे अशा प्रवृत्तीच्या विरोधात आम्ही ठामपणे बोलतच राहणार .तुषार खरात प्रकरण आणि संबंधित महिलेला जो काही त्रास झाला त्याचे सत्य लवकरच बाहेर येईल असे जोरदार प्रत्युत्तर जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केले .
विधानपरिषदचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या संदर्भात पवार यांनी केलेल्या टिपणी बद्दल गोरे यांनी रोहित पवार यांनी रामराजेंची वकिली करू नये अशी टीका केली होती या टिकेला साताऱ्यात पवार यांनी जोरदार उत्तर दिले .
ते म्हणाले दहशतीचे राजकारण करणाऱ्यांच्या विरोधात आम्ही बोलत राहणार. ते जे बोलतील म्हणजे झालं का? पोलिसांना घर गड्यासारखे काम करू नये दिवस सारखे राहत नाहीत अशी आठवण करून देत रोहित पवार म्हणाले पोलिसांनी वर्दीत राहून दुसऱ्याला धार्जिणे काम करणे योग्य नाही हा चुकीचा प्रकार सुरू आहे .राज्यात अनेक गुंड गुन्हे करूनही तुरुंगाच्या बाहेर राहतात आणि साताऱ्यात मात्र सत्तेच्या जोरावर विनाकारण काही लोकांना त्रास दिला जात आहे एका प्रकरणात तुषार खरात यांना जामीन मिळाला आहे संबंधित महिलेला ही जामीन मिळेल या प्रकरणात पोलिसांकडून दबाव आणण्याचे काम होत आहे .
त्यांनी पदाचा उपयोग विकासासाठी करावा पोलिसांना घेऊन दडपशाही करू नये अशी अपेक्षा व्यक्त करून पवार पुढे म्हणाले आम्ही वकिलांच्या संपर्कात आहोत त्यानंतर आम्ही लोकात जाणार आहोत. दोन राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाच्या संदर्भात त्यांना विचारले असता केवळ या चर्चा आहेत असे त्यांनी खंडन केले. पवार घराण्यातील ज्येष्ठ एकमेकांशी संवाद साधेतील हे त्यांचे काम आहे या संदर्भात मला कोणतीही माहिती नाही .स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कदाचित दिवाळीनंतर होतील असे त्यांनी स्पष्ट केले.
000