मुक्त पत्रकारांसाठी धोरणात्मक पाठबळ हवे - सुभाष देसाई
मुंबई / रमेश औताडे
कोरोना काळानंतर राज्यातील सर्वच घटकांना आजही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. राज्यातील मुक्त पत्रकारांनाही कोरोनाचा फटका बसला असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे सरकारने राज्यातील मुक्त पत्रकार व अंशकालीन पत्रकारांची रितसर माहिती घेण्यासाठी अधिकृत पत्रकार संघटनाच्या सहकार्याने एक समिती गठित करावी व अत्यंत निकड असेल अशा मुक्त पत्रकारांसाठी एक महामंडळ स्थापन करावे. व त्या महामंडळाच्या माध्यमातून त्यांच्या मागण्यांचा विचार करावा. अशी मागणी अखिल महाराष्ट्र राष्ट्रवादी जनरल कामगार युनियनचे महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष देसाई यांनी सरकारकडे निवेदन देत केली आहे.
मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत देसाई बोलत होते. कोरोना नंतर अनेक भांडवलदारांनी प्रिंट वृत्तपात बंद केली तर काहींनी विक्री होत नसल्याने आवृत्या कमी केल्या. तर काहींनी कामगार कपात केली. त्यामुळे अनेक पत्रकार स्वतंत्र स्वरूपात काम करत आहेत. त्यांना नियमित नोकऱ्या मिळतात ना किमान वेतन मिळत नाही. त्यामुळे अनेकांना अत्यल्प मानधनावर उदरनिर्वाह करावा लागत आहे. अनेक पत्रकार उदरनिर्वाहासाठी कर्जबाजारी झाले असून, मानसिक तणावात आहेत," असे त्यांनी सांगितले.
कोरोना नंतर अनेक भांडवलदारांनी प्रिंट वृत्तपात बंद केली तर काहींनी विक्री होत नसल्याने आवृत्या कमी केल्या. तर काहींनी कामगार कपात केली. त्यामुळे अनेक पत्रकार स्वतंत्र स्वरूपात काम करत आहेत. त्यांना नियमित नोकऱ्या मिळतात ना किमान वेतन मिळत नाही. त्यामुळे अनेकांना अत्यल्प मानधनावर उदरनिर्वाह करावा लागत आहे. अनेक पत्रकार उदरनिर्वाहासाठी कर्जबाजारी झाले असून, मानसिक तणावात आहेत," असे त्यांनी सांगितले.
बांधकाम कामगार, घरेलू कामगार, कंत्राटी कामगारांना ज्या सोयी सुविधा मिळतात त्या मुक्त पत्रकारांनाही लागू कराव्यात अशी मागणीही त्यांनी केली.
यावेळी युनियनची मुंबई कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यात रमेश औताडे (अध्यक्ष), नरेंद्र घोलप (उपाध्यक्ष), शिरीष वानखेडे (महासचिव), सुरेश गायकवाड (सचिव), अल्पेश म्हात्रे (संघटक चिटणीस), तसेच सदस्य म्हणून सुरेश ढेरे व सुबोध शाक्यरत्न यांची नियुकी करण्यात आली.
000