यूट्यूबर ज्योतीने बांग्लादेशला दिली होती भेट

त्यांनाही गुप्त माहिती दिली का? सुरू आहे शोध

यूट्यूबर ज्योतीने बांग्लादेशला दिली होती भेट

नवी दिल्ली: प्रतिनिधी 

पाकिस्तानला भारताची गुप्त माहिती पुरवल्याच्या आरोपावरून अटकेत असलेली युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिने मागील वर्षी बांग्लादेशालाही भेट दिल्याची माहिती उघड झाली आहे. या काळात तत्कालीन शेख हसीना सरकारच्या विरोधकांना तिने भारताबद्दल संवेदनशील माहिती दिली आहे का, याचाही शोध घेण्यात येत आहे. 

ज्योती सध्या हरयाणातील हिस्सार पोलिसांच्या ताब्यात असून स्थानिक पोलिसांसह एनआयए, रॉ या केंद्रीय तपास यंत्रणां तिची चौकशी करीत आहेत. आतापर्यंतच्या चौकशीत तिने पाकिस्तानला कोणतीही संवेदनशील माहिती दिल्याचे अद्याप आढळून आले नाही. तसेच तिच्या आर्थिक व्यवहारातही काही आक्षेपार्ह आढळून आले नाही, असे हिस्सार पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मात्र, तिची कसून चौकशी सुरू आहे. 

या चौकशीतच ज्योतीने फेब्रुवारी २०२४ मध्ये बांग्लादेशाला भेट दिल्याचे आढळून आले आहे. या काळात त्या देशात विद्यार्थ्यांची उग्र आंदोलने सुरू होती. ज्योतीने आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. ढाका विद्यापीठात जाऊन तिने काही व्हिडिओ केले होते. 

हे पण वाचा  बोगस कॉल सेंटरवर पोलिसांची धडक कारवाई

ज्योतीची ही बांग्लादेशाला दिलेली भेट पाक गुप्तचर यंत्रणा आयएसआय पुरस्कृत होती का? आंदोलक विद्यार्थ्यांना चिथावणी देण्याचे काम तिच्याकडून केले गेले का? शेख हसीना विरोधकांना मदत होईल असे तिने काही केले आहे का, याचा शोध तपास यंत्रणा घेत आहेत.

Tags:

About The Author

Related Posts

Advertisement

Latest News

यूट्यूबर ज्योतीने बांग्लादेशला दिली होती भेट यूट्यूबर ज्योतीने बांग्लादेशला दिली होती भेट
नवी दिल्ली: प्रतिनिधी  पाकिस्तानला भारताची गुप्त माहिती पुरवल्याच्या आरोपावरून अटकेत असलेली युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिने मागील वर्षी बांग्लादेशालाही भेट दिल्याची...
आनंद गोयल यांची शिवसेना पुणे शहर संघटकपदी नियुक्ती
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलसचिव सुभाषचंद्र भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली  
ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल रिपाइंची 'भारत जिंदाबाद रॅली'
बोगस कॉल सेंटरवर पोलिसांची धडक कारवाई
भीमनगरवासीयांचा मंत्री पाटील यांच्या कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रा. डॉ. जयंत नारळीकर यांना भावपूर्ण श्रदांजली 

Advt