पुणे- मुंबई महामार्गावर भीषण अपघात;चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं
अपघातात दोघांचा मृत्यू; चारजण गंभीर जखमी
वडगाव मावळ / प्रतिनिधी
कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने उभ्या असलेल्या टेम्पोवर जाऊन कार धडकली. या भीषण अपघातामध्ये कार मधील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. ही घटना बुधवारी (दि.५) रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे महामार्गावर ब्राम्हणवाडी, साते येथे घडली.
ताविश जावेद अहमद (वय २४), राशीद सोहराब खान (वय २४ आदर्शनगर मोशी ता. हवेली) यांचा जागीच मृत्यू झाला तर दिलशाद नियाज खान (वय २५ रा. आदर्शनगर, मोशी), महम्मद शाहीद रिझवी (वय २४), झिशान कलाम शाहीद (वय २४), फैझान मुस्ताक खान(वय २४ रा. आदर्शनगर, मोशी) हे जखमी झाले आहेत.
याबाबत खंडाप्पा बसराज हारकुडे (वय ३५ रा. ब्राम्हणवाडी, साते) यांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री फैझान मुस्ताक खान हा चार चाकी (कार नं. एम एच १२/एक्सइ ५०८३) चालवत होता. परंतु भरधाव वेगात त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभा असणारे आयशर टेम्पोच्या (एमएच ०४/एचवाय ३१७९) पाठीमागील बाजुस आदळली.
या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास पोलीस उप निरीक्षक एस. ए. जावळे करीत आहेत.
About The Author

Comment List