हिंदू संघटन ही काळाची गरज: स्वदेशानंद महाराज
आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मृतींना अभिवादन
पुणे प्रतिनिधी
जिहादी प्रवृत्तीच्या शक्तींकडून हिंदूंवर अत्याचार केले जात असून सर्व हिंदू बांधवांनी एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचे मत नरेंद्र मोदी विचार मंचचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष सुरेशानंद महाराज यांनी व्यक्त केले.
आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी नरेंद्र मोदी विचार मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष सूरज ब्रम्हे आणि पुणे शहराध्यक्ष यमराज खरात आदी मान्यवर उपस्थित होते.
सध्या जगभरात जिहादी उन्माद थैमान घालत आहे. बांगलादेशमध्ये हिंदू माता भगिनींवर अत्याचार होत आहेत. या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांनी दिलेला 'एक रहेंगे नेक रहेंगे, बटेंगे तो कटेंगे,' हा संदेश सार्थ आहे. हिंदूंचे संघटन ही काळाची गरज आहे. P हे संघटन कोणावर आक्रमण अत्याचार करण्यासाठी नाही तर स्वतःचे आणि स्वधर्माचे संरक्षण करण्यासाठी आहे, असे स्वदेशानंद महाराज यांनी सांगितले.
नरेंद्र मोदी विचार मंच हा सर्वसामान्य नागरिक आणि सरकार यांच्या मधला दुवा आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आशा अपेक्षा सरकारपर्यंत पोहोचविणे, हे मंचाचे कार्य आहे. त्याचप्रमाणे सध्याची काळाची गरज ओळखून हिंदूंना संघटित करणे हे कार्य देखील मंचाने हाती घेतले आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते लहुजी वस्ताद साळवे यांच्या समाधीचे पूजन करण्यात आले. यमराज खरात यांनी मान्यवरांचे स्वागत व आभार प्रदर्शन केले.