चिखलसे ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी स्वाती भाऊसाहेब पाराटे यांची बिनविरोध निवड
विकासकामांचे जास्तीत जास्त प्रश्न सोडविणार- नवनिर्वाचित उपसरपंच स्वाती पाराटे
वडगाव मावळ/ प्रतिनिधी
मावळ तालुक्यातील चिखलसे ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदावर स्वाती भाऊसाहेब पाराटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. या पदासाठी पाराटे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची माहिती ग्रामसेवक अधिकारी गोमसाळे यांनी दिली.
यावेळी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच सचिन काजळे सदस्या वैशाली खंडू काजळे,सविता सोमनाथ काजळे, शोभा स़ंभाजी शिंदे,संतोष शेडगे,
रोहित दाभाडे किसन काजळे निलेश चव्हाण,बळीराम चव्हाण डाॅ गणेश जाधव आदीजण उपस्थित होते.
चिखलसे येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांना काम करण्याची संधी मिळावी या हेतूने उपसरपंच संतोष शेडगे यांनी स्वखुशीने उपसरपंच पदाचा राजीनामा दिला.या रिक्त जागेसाठी सरपंच सचिन काजळे यांच्या अध्यक्षतेखालील ग्रामपंचायत कार्यालयात सभा घेण्यात आली उपसंरपच पदासाठी स्वाती भाऊसाहेब पाराटे यांचा एकमेव अर्ज दाख असल्याने उपसंरपचपदी स्वाती भाऊसाहेब पाराटे बिनविरोध निवड झाली असल्याचे घोषित करण्यात आले.
यावेळी नवनिर्वाचित उपसंरपच स्वाती भाऊसाहेब पाराटे यांचा ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानाने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. पारंपारिक पध्दतीने वांजत्री ताफा लावून भंडाराची उधळण करीत मिरवणूक काढण्यात आली याप्रसंगी समस्त ग्रामस्थ व सर्व कर्मचारीवर्ग उपस्थित होते.
गावच्या विकासासाठी विश्वासाने दिलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडू सरपंच व सर्व सदस्यांना सोबत घेऊन विकासकामांचे जास्तीत जास्त प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार
- स्वाती भाऊसाहेब पाराटे
- नवनिर्वाचित उपसरपंच चिखलसे ग्रुप ग्रामपंचायत
About The Author

Comment List