गोसेवा आयोगाच्या पाठीशी शासन खंबीर पणे उभे - पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

महाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अधिवक्ता कार्यशाळेचे आयोजन

गोसेवा आयोगाच्या पाठीशी शासन खंबीर पणे उभे - पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

पुणे - महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे गोसंवर्धन व गोसंरक्षणाचे कार्य उत्तम असुन गोसेवा आयोगामार्फत गोसंवर्धन व पशुंच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन केले जाते. या उपक्रमांसाठी शासनातर्फे सहकार्य करण्यात येईल. गोसेवा आयोगाच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. असे प्रतिपादन राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. 
 
महाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय अधिवक्ता कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी  त्या बोलत होत्या. यावेळी निवृत्त न्यायमुर्ती अंबादास जोशी, गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त डॉ. प्रविण देवरे, महाराष्ट्र गोवा बार कौन्सिल अध्यक्ष पारिजात पांडे, आयोगाचे अशासकीय सदस्य सनात गुप्ता, डॉ. नितीन मार्कंडेय, उध्दव नेरकर, संजय भोसले, सुनिल सुर्यवंशी, आदी मान्यवर उपस्थित होते. 
 
मुंडे पुढे म्हणाल्या, देशामध्ये गायींच्या संरक्षणासाठी व संवर्धनासाठी सर्वात जास्त निधी महाराष्ट्रात खर्च केला जातो. गोसेवेतून गायी वाचविण्याबरोबरच गोवंशसुध्दा वाचविला पाहिजे. गाय आपल्या देशात केवळ एक पाळीव प्राणी नाही तर ती आपल्या संस्कृतीचा, धार्मिकतेचा आणि जीवनशैलीचा एक महत्वाचा भाग आहे. 
 
हिंदु धर्मात गायीला माता म्हणून मान्यता दिली आहे. हिंदू धर्मात गायीला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. गायीचा सांभाळ करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. प्राण्यांविषयी संवेदनशिलता बाळगली पाहिजे. प्राण्यांची हिंसा टाळण्यासाठी प्रत्येक प्राण्याला देवाचे वाहन केले आहे.  गायीच्या गोबरचा जैविक खत म्हणून वापर केला जातो. गायीच्या दुधापासून व  गोबर पासून लाखो लोकांचे जीवनमान चालत असते. गोवंशाच्या हत्येमुळे ग्रामीण अर्थ व्यवस्थेला मोठा धोका बसतो त्याच बरोबर छोट्या शेतकऱ्यांचा आधारही कमी होतो.  त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट होते. असे त्यांनी सांगितले.  
 
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात गोसेवा आयोगाचे अध्यक्षा शेखर मुंदडा म्हणाले, महाराष्ट्रात 1 हजार 67 गोशाळा आहेत. बऱ्याच गोशाळा नोंदणीकृत असून काही गोशाळांनी अजुन नोंदणी केलेली नाही. गोशाळांनी नोंदणी करणे अनिवार्य असून, गोवंश गोशाळेत न जाता तो शेतकऱ्यांनी सांभाळला पाहिजे, गोशाळा स्वावलंबित झाल्या पाहिजेत. यासाठी आम्ही काम करित आहोत.  पशुसंवर्धन खात्याने सर्व प्राण्यांचे टॅगींग केले असून याचा फायदा आम्हाला काम करतांना होत आहे. आयोगाची स्वतंत्र गोरक्षक समिती स्थापन करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. आयोगातर्फे सुरु असलेल्या कामाकाजाची माहिती  देऊन त्यांनी  कार्यशाळेचा उद्देश विषद केला. 
 
कार्यक्रमात पशुसंवर्धन विभागाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या 1962 महापशुधन संजीवणी तात्काळ प्रतिसाद केंद्राचे उद्घाटन पशुसंवर्धन मंत्री मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर सुपर स्पेशालिटी व्हेटर्नरी हॉस्पिटलच्या नवीन इमारतीची पाहणी करुन प्रयोगशाळेस भेट दिली. 
 
या कार्यशाळेत राज्यातील गोवंश हत्याबंदी कायद्याचे केसेस लढविणारे सुमारे 100 अनुभवी वकील, पशुसंवर्धन विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. 
 
000

Share this article

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

Follow us