'तालकटोरा मैदानात उभारावे मराठा वीरांचे पुतळे'

शरद पवार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी

'तालकटोरा मैदानात उभारावे मराठा वीरांचे पुतळे'

मुंबई: प्रतिनिधी 

एकेकाळी दिल्लीचे तख्त राखणारे पहिले बाजीराव पेशवे, महादजी शिंदे आणि मल्हारराव होळकर या मराठा वीरांचे पुतळे राजधानी दिल्लीतील तालकटोरा मैदानावर उभारण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. 

पवार यांनी मोदी यांना पाठवलेल्या पत्रात नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहिल्याबद्दल पवार यांनी मोदी यांचे आभार मानले आहेत. उद्घाटन समारंभात आपण केलेल्या उद्बोधक आणि प्रभावी भाषणामुळे जगभरातील मराठी माणूस समाधानी असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. शरद पवार हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते.

हे संमेलन ज्या ठिकाणी पार पडले त्यात तालकटोरा मैदानावर पहिले बाजीराव पेशवे, महादजी शिंदे, मल्हारराव होळकर या वीरांचे अर्धाकृती पुतळे उभारले जावे, अशी विनंती या संमेलनाचे आयोजन करणाऱ्या सरहद या संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे तर काही साहित्यिकांनी या तिघांचे पूर्णाकृती अश्वारूढ पुतळे उभारले जावे अशी मागणी केली आहे. आपल्या कार्यकाळात भारताच्या जाज्वल्य इतिहास आणि परंपरांचे जतन आणि संवर्धन केले जाते. त्यामुळे या तिघा वीरांच्या पुतळ्याच्या उभारणीसाठी आपण संबंधितांना सूचना कराव्या, अशी विनंती पवार यांनी पंतप्रधानांना पत्राद्वारे केली आहे. 

हे पण वाचा  पाकिस्तानचा जम्मू विमानतळावर क्षेपणास्त्र हल्ला

 

About The Author

Advertisement

Latest News

पाकिस्तानात हाहा:कार, कराची बेचिराख पाकिस्तानात हाहा:कार, कराची बेचिराख
नवी दिल्ली: प्रतिनिधी  काल संध्याकाळी भारताच्या विविध लष्करी तळांवर हल्ले करून पाकिस्तानने काढलेल्या कुरपतीचे अपेक्षेपेक्षा अधिक वाईट फळ पाकिस्तानला भोगावे...
इस्लामाबादसह पाकिस्तानच्या सात शहरांवर ड्रोन हल्ले
पाकिस्तानचा जम्मू विमानतळावर क्षेपणास्त्र हल्ला
सुदर्शनचक्राने केले पाक हवाई हल्ल्यापासून भारताचे संरक्षण
लाहोरपाठोपाठ कराचीतही भर दिवसा धमाका
शुभमन गिलच्या गळ्यात पडणार कसोटी कर्णधार पदाची माला
‘सोमेश्वर फाउंडेशन’तर्फे 'पुणे आयडॉल’ स्पर्धा १९ मेपासून 

Advt