सुनेत्रा पवार अचानक पिंपरी चिंचवड महापालिकेत

शहराच्या समस्यांबाबत आयुक्तांशी चर्चा

सुनेत्रा पवार अचानक पिंपरी चिंचवड महापालिकेत

पिंपरी : प्रतिनिधी 

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी आज अचानक पिंपरी चिंचवड महापालिकेला भेट देऊन आयुक्तांशी चर्चा केली. शहरातील समस्यांबाबत एक आठवड्याच्या कालावधीत मार्ग काढला जाईल, अशी ग्वाही आयुक्त शेखर सिंह यांनी पवार यांच्याशी बोलताना दिली. 

दीर्घकाळ महापालिकेच्या निवडणुका न झाल्यामुळे शहराचा कारभार प्रशासनाच्या ताब्यात आहे. या पूर्वी पिंपरी चिंचवड महापालिकेची सत्ता भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात होती. सध्याच्या काळात देखील शहरात भाजपचा वरचष्मा असल्यामुळे प्रशासनाकडून भाजप पदाधिकाऱ्यांना झोपते माप दिले जाते आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची गळचेपी केली जाते, अशा तक्रारी आल्यामुळेच सुनेत्रा पवार यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेत आयुक्तांची भेट घेऊन त्यांची कानउघाडणी केल्याचे सांगितले जात आहे. एक आठवड्याच्या कालावधीत सर्व कामांचा आढावा घेतला जाईल आणि कामे मार्गी लावली जातील, अशी ग्वाही शेखर सिंह यांनी सुनेत्रा पवार यांना दिली आहे. 

पिंपरी चिंचवड क्षेत्रात अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार आहेत. शहरातील पक्ष पदाधिकाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी खुद्द सुनेत्रा पवार यांना महापालिकेत धाव घ्यावी लागते म्हणजे बनसोडे यांची प्रशासनावरील पकड ढीली पडली आहे काय, असा सवाल केला जात आहे. 

Share this article

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

Follow us