१० मार्च पासून ऊस तोडणी मशीन मालक करणार बेमुदत आंदोलन!

साखर आयुक्तांना दिले निवेदन

१० मार्च पासून ऊस तोडणी मशीन मालक करणार बेमुदत आंदोलन!

पुणे : ऊस तोडणी मशीनचा तोडणीदर ५० टक्यांनी वाढवून देणे, बँकेचे हप्ते आहेत त्या परिस्थितीत ३ वर्ष मुदत वाढ मिळावी आणि पाचट कपात १.५ टक्के असावी. या सारख्या अनेक महत्वपूर्ण मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी मशिन मालक संघटनेचे सचिव अमोलराजे वसंतराव जाधव व त्यांच्या सहकार्‍यांनी बुधवारी साखर आयुक्त सिद्धराम सालीमठ यांना दिले. या मागण्यांसाठी राज्यातील १३०० मशीन मालक १० मार्च पासून साखर संकुल समोर बेमुदत आंदोलनास बसण्याचा इशारा दिला आहे. तसेच हे निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री यांना सुद्धा देण्यात येणार आहे.

साखर आयुक्तांना निवेदन देतांना संघटनेचे अभय कोल्हे, राजाभाऊ लोमटे, धनंजय काळे, गणेश यादव, निलेश बागटे, कलीम शेख, शरद चव्हाण, राहुल इथापे आणि रजत नलावडे उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी मशीन मालक संघटना, सातारा यांच्या वतीने ऊस मशीनचे तोडणीदार/वाहातूकदार वाढविणेबाबतची मागणी सुद्धा केली आहे. कृषी क्षेत्रातील प्रोत्साहन पर योजनेमुळे कृषी यांत्रिकीकरणात गतीने वाढ झाली आहे. यामुळे राज्यात ऊस तोडणी मशीन जवळपास १३०० मशिन कार्यरत असून यातील काहींना अनुदान मिळाले आहे. त्यातच २०१९ पासून जवळपास ९०० मशिनला अनुदान मिळालेले नाही. यासाठी वेळोवेळी आंदोलन करण्यात आले पण त्यांना न्याय मिळाला नाही.

डिझेल वृद्धिमुळे एक टन ऊस तोडणीसाठी मशीनला जवळपास ३ लीटर डिझेल लागत असून २६० ते २८० रू. खर्च येतो. मशिन चालविण्यासाठी ऑपरेटर/इनफिल्डर ड्रायव्हर यांचे पगार, टनानूसार ऑपरेटिंग खर्च ८० रूपये येतो. दुरूस्ती, ग्रीस व स्पेअर पार्टससाठी प्रति टनानूसार १०० रूपये खर्च येतो. म्हणजेच एक टन ऊस तोडणीसाठी ४६० रूपये खर्च येतो. इकडे कारखाने आम्हाला ४५० ते ५०० रूपये देतात. आम्हाला आवक कमी असून बँकेचे हप्ते भरणे ही अवघड झाले आहे.

आयुक्तांच्या जी.आर नुसार ४.५ टक्के पाचट कपात ही शेतकर्‍यांकडून ऊस तोडणीदार आणि वाहतूकदार यांच्याकडून एकूण १३.५ टक्के केली जात आहे. त्यामुळेच राज्यातील सर्व मशीन मालकांची ही समस्या लवकर सोडवावी अशी मागणी संघटनेने केली आहे.

000

Share this article

About The Author

Post Comment

Comment List

Follow us