निवृत्तीच्या चर्चांना रोहितने दिला पूर्णविराम

एक दिवसीय विश्वचषक जिंकण्याचा व्यक्त केला निर्धार

निवृत्तीच्या चर्चांना रोहितने दिला पूर्णविराम

दुबई: वृत्तसंस्था 

टीम इंडियाने मिळविलेल्या क्रिकेट वन डे चॅम्पियनशिप किताबाचा आनंद साजरा करतानाच क्रिकेट प्रेमींना धाकधूक होती ती रोहित शर्मा निवृत्तीची घोषणा करतो की काय, याची! मात्र, रोहितने आपण सध्या तरी निवृत्तीचा विचार करत नसल्याचे सांगत चाहत्यांना दिलासा दिला. इतकेच नाही तर सन 2027 ची एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा जिंकण्याचा निर्धारही व्यक्त केला. 

वन डे चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना हा रोहित शर्मा याचा एकादिवशीय क्रिकेटमधील शेवटचा सामना असेल. या सामन्यानंतर रोहित शर्मा एकदिवसीय क्रिकेटमधील निवृत्ती जाहीर करेल, अशा चर्चेने क्रिकेट प्रेमींमध्ये जोर धरला होता. मात्र, निवृत्तीचा विचार नसल्याचे संगत रोहितने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 

रोहित शर्मा याच्या कारकिर्दीत भारतीय क्रिकेट संघाने यापूर्वी t 20 विश्वचषक जिंकला आहे. काल त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने एकदिवसीय चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली. आता एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा जिंकण्याचा रोहितचा निर्धार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली सन 2023 मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने उत्तम कामगिरी केली होती. मात्र, अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघाचा पराभव केला. 

 

Share this article

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

Follow us