श्रीनिवास देशिंगकर यांना ग्लोबल पॉवर लीडर अवॉर्ड

व्हाईट पेज इंटरनॅशनलतर्फे करण्यात आला सन्मान

श्रीनिवास देशिंगकर यांना ग्लोबल पॉवर लीडर अवॉर्ड

 पुणे: प्रतिनिधी

श्रीटेक डेटा लिमिटेडचे संस्थापक व अध्यक्ष श्रीनिवास देशिंगकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विजयानंद चौधरी यांना उद्योग क्षेत्रातील योगदानाबद्दल व्हाईट पेज इंटरनॅशनलतर्फे  'ग्लोबल पॉवर लीडर अवॉर्ड-२०२५' प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार लंडन येथील हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये आयोजित 'ग्लोबल बिझनेस कॉन्क्लेव्ह-२०२५' मध्ये नुकताच प्रदान करण्यात आला.साउथवर्कच्या महापौर आणि एफजीएम अॅम्बेसडर नईमा अली तसेच लंडनस्थित उत्तर मॅसेडोनियाच्या राजदूत कटेरिना स्टाव्रेस्का यांच्या हस्ते  पुरस्कार  प्रदान करण्यात आले.

याशिवाय,श्रीटेक डेटा लिमिटेडला याच कॉन्क्लेव्हमध्ये 'ग्लोबल पॉवर ब्रँड अवॉर्ड-२०२५' नेही सन्मानित करण्यात आले.

Share this article

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

Follow us