'भाजपची स्क्रिप्ट वाचून मंत्रिपदाची किंमत चुकवता का?'

काँग्रेस प्रवक्त्यांचा शिवेंद्रराजे भोसले यांना खडा सवाल

'भाजपची स्क्रिप्ट वाचून मंत्रिपदाची किंमत चुकवता का?'

पुणे: प्रतिनिधी 

शिवछत्रपतींच्या रयतेच्या राज्याची संकल्पना ऊदधोषित करणारी ‘शिवमुद्रेची प्रतिमा’ भारतीय संविघानात तसेच महाराष्ट्राच्या राजमुद्रेत असूनही शिवेंद्रराजेंना ती दिसू नये, हे महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याचे प्रतिपादन काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केले. मंत्री शिवेंद्र राजे यांनी काँग्रेसवर केलेल्या आरोपांवर तिवारी यांनी पलटवार केला आहे.  भाजपचे स्क्रिप्ट वाचून मंत्रिपदाची किंमत चुकवत. आहेत का, असा सवालही त्यांनी शिवेंद्रराजे यांना केला आहे.

काँग्रेसने छत्रपती शिवरायांच्या बदनामीचा कट रचला आहे. काँग्रेसच्या काळात शिवछत्रपतींची केवळ उपेक्षाच करण्यात आली. शिवछत्रपतींच्या इतिहासाच्या खुणा जपण्याचे कार्य केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातच झाले आहे, असा दावा शिवेंद्रराजे भोसले यांनी केला आहे. तिवारी यांनी या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना बगल देण्याचे कुटील कारस्थान भाजप सत्ताधारी करत असून आता सातारा गादीच्या वंशंजांचाही दुरुपयोग भाजप करत आहे, असा आरोप त्यांनी केला. 

काँग्रेसच्या काळात शिवछत्रपतींच्या नांवे व महाराजांच्या प्रती निष्ठा समर्पित करून उभारलेल्या संस्था, विद्यापीठे, इन्फ्रास्ट्रक्चर, विमानतळे इ ची मालिका त्यांनी समोर आणली आहे.

हे पण वाचा  प्रथमच मराठी चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा जेलमध्ये 

महाराष्ट्र शासनाचा शिव छत्रपती शिवाजी पुरस्कार (६९-७०) साली सुरु झाला. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम पुणे (बालेवाडी), कोल्हापूर, रत्नागिरी इ ठिकाणी काँग्रेस सत्ताकाळात सुरु झाली. व्हिक्टोरीया टर्मिनस (व्हीटी) चे नामकरण (सीएसटी) “छत्रपती शिवाजीमहाराज टर्मिनस” असे तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री सुरेश कलमाडी यांच्या, अर्थात काँग्रेस सरकार काळात झाले.

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा कलश तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी आणल्यावर राज्याची राजधानी झालेल्या ‘आंतरराष्ट्रीय मुंबई विमानतळाचे’ नामकरण छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ हे काँग्रेस काळात झाले परंतु आता त्याचे नांव अडानी एअरपोर्ट करण्याचे प्रयत्न शिवेंद्रराजे ना दिसत नाही काय, असा उपहासात्मक सवाल काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला. संसदेत भाजप खासदाराची मजल, पूर्वजन्मी नरेंद्र मोदी हे शिवाजी महाराज होते असे बोलण्यापर्यत जाते. हे शिवेंद्र राजे भोसले यांना मान्य आहे काय, असा सवालही तिवारी यांनी केला.

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरी होण्यासाठी १९ फेब्रुवारी हा दिवस (इंग्रजी तारखेप्रमाणे) निश्चित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य काँग्रेस राज्य सरकार काळात झाले. महाराष्ट्रात शिवाजी विद्यापीठाची स्थापना काँग्रेस काळात झाली याचे ही विस्मरण शिवेंद्र राजेंना झाले काय?

पुणे महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रु रोजीच साजरी करण्याच्या हेतूने व मोठ्या संख्येने शिवप्रेमींचा सहभाग व्हावा या करीता उत्तेजनार्थ बक्षीसे व पारितोषिके आपण स्वतः मागणी प्रस्ताव देऊन तत्कालीन महापौर मोहनसिंह राजपाल यांचे कारकिर्दित २०१० साली सुरू केली याचा अभिमान वाटत असल्याचे ही काँग्रेस राज्य प्रवक्ते व पुणे मनपाचे माजी नगरसेवक गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले.

प्रतापगड, शिवनेरी - जुन्नर परीसर ते बालेवाडी, पुणे शहरातील शिवछत्रपतींची स्मारके भव्य अश्वारुढ बहुतांश सर्व पुतळे हे काँग्रेस सत्तेच्या राजवटीतच विविध जिल्हा - तालुका स्तरावर झाली.  कोल्हापूरमघील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण माजी मंत्री सतेज पाटील यांनी काँग्रेस नेते राहूल गांधी यांचे हस्ते ६ आक्टो २४ ला केले. राज्यातील ही सर्व स्मारके, तत्कालीन पंतप्रघान पं नेहरूंनी संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापना वर्षात प्रतापगडावरील अनावरण केलेला अश्वारुढ पुतळा वर्षानुवर्षे उन, वारा, पाऊस अंगावर घेत दिमाखात उभा आहे. विद्यमान पंतप्रधानांनी अनावरण केलेल्या सिंधुदुर्ग येथील भ्रष्टाचाराने बरबरटलेल्या पुतळ्याप्रमाणे घारातीर्थी पडला नाही, इकडे देखील शिवेंद्रराजे लक्ष देतील काय, असा सवाल तिवारी यांनी केला. महाराष्ट्रातच नव्हे तर विविघ राज्यांच्या राजधानीत व संसदेतही शिवाजी महाराजांचा पुतळा कोणाच्या कारकिर्दीत उभे राहीले, याची माहिती शिवेंद्रराजेंनी घेतली तर काँग्रेस पक्षाने महाराजांबद्दल, त्यांच्या विविघ धर्मीय, अठरापगड जातींना बरोबर घेऊन रयतेचे राज्य करण्याच्या संकल्पनेबद्दल खरे कृतीशील योगदान कोणाचे याचा बोघ घेण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे योगदान समजेल व शिवछत्रपतींबाबत भाजप करीत असलेले संकुचित राजकारण लक्षात येईल, असेही काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, जनतेचे  कोट्यावघी रुपये खर्ची पाडून, कोट्यावधींच्या पानभर जाहिरातबाजी करून अरबी समुद्रात’ दस्तूरखुद्द पंतप्रघान नरेंद्र  मोदींच्या हस्ते जलपूजन होऊन दशकभराचा कालावधी ओलांडून देखील आपल्याच घराण्यातील श्रीमंत संभाजी राजे यांनी बोटीद्वारे दुर्बीण लाऊन मुंबई समुद्रात केलेल्या पाहणीत त्यांना आढळला नाही तसेच मुंबई सह महाराष्ट्राच्या जनतेस ही अद्याप नजरेस पडला नाही. ही मोदी - फडणवीसांच्या भाजप सरकारने केलेली महाराजांची थट्टा नाही काय, यावर ही थोडे विचार मंथन करावे, असे ही काँग्रेसने म्हंटले आहे. महाविकास आघाडीतील सर्व पक्षांच्या ऊमेदवारीचा पर्याय समोर असतांना श्रीमंत शाहू महाराज यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची निवड केली याकडे ही त्यांनी लक्ष वेधले.

याउलट हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजां विषयी, संभाजी महाराजांविषयी, दोघांच्याही पराक्रम, इतिहासाविषयी कर्नाटक भाजपचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे दस्तुरखुद्द राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह पूर्वीच्या हिंदू महासभेचे संस्थापक वि दा सावरकर, तत्कालीन सरसंघचालक मा स गोलवळकर यांच्यापासून ते राहुल सोलापूरकर, कोरटकर यांनी जी मुक्ताफळे ती सर्व शिवेंद्रराजेंच्या गिनतीत नाहीत वा जाणीवपूर्वक दुर्लक्षीत करीत आहेत,  असा संतप्त सवाल काँग्रेसने केला व शिवाजीमहाराजांच्या रयते प्रती, बळीराजा प्रती, महिला भगिनींच्या सुरक्षेचा वारसा आणि वसा खऱ्या अर्थाने जर कोणी जपला असेल, तर काँग्रेस पक्षानेच, हे वरील वास्तव दर्शवणाऱ्या बाबींवरून स्पष्ट होत असल्याचेही काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी दिलेल्या प्रसिद्धी निवेदनात म्हटले आहे.

About The Author

Advertisement

Latest News

Advt