Prashant Koratkar Arrested | प्रशांत कोरटकरला तेलंगणात अटक!

Prashant Koratkar Arrested | प्रशांत कोरटकरला तेलंगणात अटक!

कोल्हापूर : छत्रपती शिवरायांचा अवमान केल्याप्रकरणी तसेच  इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना  धमकावणारा प्रशांत कोरटकर याला सोमवारी तेलंगणा  येथे कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लवकरच त्याला कोल्हापूरात आणण्यात येणार आहे. अनेक दिवस तो पोलिसांना गुंगारा देऊन आपला ठाव ठिकाणा बदलत होता. त्यामुळे पोलिसांना शोध घेणे अवघड झाले होते.

 छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकावल्या प्रकरणी प्रशांत कोरटकर यांच्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच नागपूर येथेही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी कोल्हापुरात प्रयत्न केला होता. कोल्हापूर जिल्हा न्यायालयाने त्याला काही अंशी दिलासा दिला होता .मात्र विविध संघटनांच्या दबाव यामुळे त्याचा अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर त्याने मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्जासाठी प्रयत्न केले होते. 

दरम्यान जुना राजवाडा पोलीस त्याच्या शोधात होते. मात्र अटकेच्या भीतीने तो विविध ठिकाणी फळ काढत होता त्यामुळे त्याचा निश्चित हा ठिकाणा लागत नव्हता. कोल्हापूर पोलीस त्याच्या पाळतीवर होते. तसेच नागपुरातही ठाण मांडून बसले होते. मागील दोन दिवसात तो दुबईला पळून गेला आहे अशी अफवा होती .  त्यानंतर पोलिसांनी त्याच्या पत्नीला पासपोर्ट जमा करावा अशी नोटीस दिली होती. त्याच्या पत्नीने तत्काळ सदरचा हा पासपोर्ट पोलिसांच्याकडे जमा केला होता. त्यामुळे तो बाहेर पळून न गेल्याचे सिद्ध झाले होते. अखेर कोल्हापूर पोलिसांनीच त्याचा तपास करून  मुसक्या आवळल्या आहेत.

000

हे पण वाचा  ढोले पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये "क्षितिज 2024-25'' संपन्न

About The Author

Advertisement

Latest News

ईदची नको, हवी न्यायाची भेट! ईदची नको, हवी न्यायाची भेट!
स्थित्यंतर / राही भिडे हिंदू, इस्लामसह अन्य धर्मातही असे मानले जाते की इतरांना, विशेषतः दुर्बलांना मदत केल्याने पुण्य मिळते. त्यामुळे...
नाट्य परिषद कोथरूड शाखेने उभारली सांस्कृतिक कलावंत गुढी
गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला नव्या संचातील 'तुझे आहे तुजपाशी'चा  रौप्यमहोत्सवी प्रयोग सादर
लष्करी अधिकाऱ्याकडून लष्करी अधिकाऱ्याचीच फसवणूक
ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख शिंदे गटात डेरेदाखल
खंडणी आणि खुनाबाबत प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचा महत्त्वाचा जबाब
महाराष्ट्र बँक सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेकडून सामाजिक कृतज्ञता निधी समर्पण

Advt