ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख शिंदे गटात डेरेदाखल

वडगाव शेरीसह कसबा, कोथरूडमधील अनेक शिवसैनिक शिंदे गटात

ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख शिंदे गटात डेरेदाखल

पुणे: प्रतिनिधी 

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठ्या प्रमाणावर गळती लागली असून नुकताच ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख आनंद गोयल यांनीही ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र' करून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. पुणे शहरात पक्ष वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

वडगाव शेरी, कसबा आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील शेकडो पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी ठाकरे गट सोडून शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुंबई येथे खुद्द पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. 

आपण आठ वर्ष शिवसेना उद्धव ठाकरे गटात कार्यरत राहिलो. पक्ष वाढीसाठी आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जीवापाड प्रयत्न केले. मात्र, पक्षनेतृत्वाकडून पुणे शहराची कायम उपेक्षा करण्यात आली. त्यामुळे शहरात विकासकामे होऊ शकली नाहीत. शिवसैनिकांनी केलेल्या कामाची दखल पक्षनेतृत्वाने कधीही घेतली नाही. त्यामुळे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि विकासकामे करण्यासाठी आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला असून तळागाळापर्यंत पक्ष पोहोचविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करू, अशी ग्वाही गोयल यांनी दिली आहे. 

हे पण वाचा  खंडणी आणि खुनाबाबत प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचा महत्त्वाचा जबाब

दीर्घकाळ रखडलेल्या महापालिका निवडणुका न्यायालयाच्या निकालानंतर केव्हाही होण्याची शक्यता असताना ठाकरे गटाला लागलेली गळती ही पक्षासाठी चिंतेची बाब ठरणार आहे. मागील महिन्यात ठाकरे गटाच्या पाच माजी नगरसेवकांनी आपला पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्या पाठोपाठ गोयल यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाला रामराम करून शिंदे गटात सहभागी होणे, हा ठाकरे गटाला मोठा धक्का आहे. 

Tags:

About The Author

Related Posts

Advertisement

Latest News

ईदची नको, हवी न्यायाची भेट! ईदची नको, हवी न्यायाची भेट!
स्थित्यंतर / राही भिडे हिंदू, इस्लामसह अन्य धर्मातही असे मानले जाते की इतरांना, विशेषतः दुर्बलांना मदत केल्याने पुण्य मिळते. त्यामुळे...
नाट्य परिषद कोथरूड शाखेने उभारली सांस्कृतिक कलावंत गुढी
गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला नव्या संचातील 'तुझे आहे तुजपाशी'चा  रौप्यमहोत्सवी प्रयोग सादर
लष्करी अधिकाऱ्याकडून लष्करी अधिकाऱ्याचीच फसवणूक
ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख शिंदे गटात डेरेदाखल
खंडणी आणि खुनाबाबत प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचा महत्त्वाचा जबाब
महाराष्ट्र बँक सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेकडून सामाजिक कृतज्ञता निधी समर्पण

Advt