खंडणी आणि खुनाबाबत प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचा महत्त्वाचा जबाब

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींचे पाय आणखी खोलात

खंडणी आणि खुनाबाबत प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचा महत्त्वाचा जबाब

बीड: प्रतिनिधी

सुदर्शन घुले याने आवादा कंपनीच्या लोकांकडे खंडणीची मागणी केली आणि संतोष देशमुख यांना जिवंत न ठेवण्याची धमकी देखील दिली, असा महत्वपूर्ण जबाब कंपनीच्या बाहेर चहा पीत असलेल्या एका प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने दिला आहे. ही साक्ष या खटल्यात महत्त्वाची ठरणार असून त्यामुळे आरोपींचे पाय आणखी खोलात जाणार आहेत.

मी वाल्मीक कराड यांचा माणूस आहे. कंपनी चालू ठेवायची असेल तर अण्णाला दोन कोटी रुपये द्या. नाहीतर कंपनी बंद पाडू, अशी धमकी सुदर्शन घुले यांनी आवाज कंपनीच्या लोकांना दिली. त्यावर, कंपनी बंद पडू नका गावातल्या लोकांना रोजगार मिळू द्या, अशी विनंती सरपंच देशमुख यांनी घुले याला केली. मात्र,  ही विनंती धुडकावून घुले याने, तुझ्याकडे बघून घेऊ. तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देशमुख यांना दिली, असा जबाब या साक्षीदाराने दिला आहे.

ही घटना घडली त्यावेळी हा साक्षीदार कंपनीच्या बाहेर असलेल्या एका टपरीवर चहा पीत होता. त्यामुळे तो खंडणी आणि धमकीच्या प्रकरणाचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार ठरला आहे. त्यामुळे या खटल्यात त्याच्या साक्षीला विलक्षण महत्त्व प्राप्त झाले आहे.

हे पण वाचा  पुण्यात होणार सर्वात मोठा ग्लोबल एज्युकेशन फेअर

खटल्याचे कामकाज द्रुतगती न्यायालयात व्हावे

दरम्यान, संतोष देशमुख हत्याप्रकरणी खटल्याचे कामकाज सुरू झाले आहे. विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. हे सर्व गुन्हेगार एकच असून त्यांनी एकत्रितपणेच खंडणी, अपहरण आणि हत्येचा गुन्हा केला आहे. या सर्वांना फाशीची शिक्षा होणे आवश्यक आहे. खटल्याचे कामकाज वेगाने होण्यासाठी ते द्रुतगती न्यायालयात व्हावे, अशी मागणी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केली आहे. 

 

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

ईदची नको, हवी न्यायाची भेट! ईदची नको, हवी न्यायाची भेट!
स्थित्यंतर / राही भिडे हिंदू, इस्लामसह अन्य धर्मातही असे मानले जाते की इतरांना, विशेषतः दुर्बलांना मदत केल्याने पुण्य मिळते. त्यामुळे...
नाट्य परिषद कोथरूड शाखेने उभारली सांस्कृतिक कलावंत गुढी
गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला नव्या संचातील 'तुझे आहे तुजपाशी'चा  रौप्यमहोत्सवी प्रयोग सादर
लष्करी अधिकाऱ्याकडून लष्करी अधिकाऱ्याचीच फसवणूक
ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख शिंदे गटात डेरेदाखल
खंडणी आणि खुनाबाबत प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचा महत्त्वाचा जबाब
महाराष्ट्र बँक सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेकडून सामाजिक कृतज्ञता निधी समर्पण

Advt