मावळातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पुणे जिल्हा परिषदेत नोटा उधळूण आंदोलन
मिनी मंत्रालय नाही तर, मनी मंत्रालय आहे, अशा घोषणा देत पुणे जिल्हा परिषदेच्या आवारात आंदोलन
वडगाव मावळ/सतिश गाडे
मावळ तालुक्यातील खडकाळा ग्रापंचायतीमध्ये कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्यांने जिल्हा परिषदेच्या नोकर भरती प्रक्रियेत अन्याय झाल्याचा आरोप करत पुणे जिल्हा परिषदेच्या आवारात नोटांची उधळण करत आंदोलन केले.
अनिल शिरसाट असे या आंदोलन करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे नाव असून जिल्हा परिषदेच्या नोकरी भरतीत एकूण रिक्त जागांपैकी १० टक्के जागा या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी राखीव असतात. या राखीव जागा सेवाज्येष्ठतेनुसार भरल्या जातात. भरतीमध्ये अन्याय झाल्याचा शिरसाट यांचा आरोप आहे.
यावेळी आंदोलन करणारे शिरसाट यांनी तीन वर्षांपासून न्याय मागतोय, एकाही अधिकाऱ्याने न्याय दिला नाही.,हे मिनी मंत्रालय नाही तर, मनी मंत्रालय आहे, अशा घोषणा देत म्हणत शिरसाट यांनी मजोर अधिकाऱ्यांचा निषेध करत स्वतःच्या गळ्यातील पैशांच्या नोटा जिल्हा परिषदेच्या आवारात उधळून आंदोलन केले.
मात्र आंदोलन करणारे शिरसाट यांनी पूर्व परवानगी न घेता आंदोलन केल्यामुळे या कर्मचाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले .
About The Author
