'आपल्याला मिळाली होती वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरची सुपारी'

निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले याचा खळबळजनक दावा

'आपल्याला मिळाली होती वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरची सुपारी'

बीड: प्रतिनिधी

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी मुख्य आरोपी वाल्मीक कराड याचा एन्काऊंटर करण्याची सुपारी आपल्याकडे आली होती, असा खळबळजनक दावा निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले यांनी केला आहे. राज्यातील अनेक एन्काऊंटर्स बोगस असल्याचेही त्याचे म्हणणे आहे. 

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेला वाल्मीक कराड याला मारण्यासाठी आपल्याला सुपारी देण्यात आली होती, असा दवा करणारी चित्रफीत कासले याने आपल्या फेसबुक अकाउंट वरून प्रसिद्ध केली आहे. त्याचप्रमाणे अनेक एन्काऊंटर्स सुपारी देऊन करण्यात आले असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. 

आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपावरून निलंबित करण्यात आलेला कासले यांनी यापूर्वी देखील अशाच प्रकारचे खळबळ जनक दावे केले आहेत. त्याबद्दल त्याच्यावर पोलीस कारवाई देखील करण्यात आली आहे. त्याच्या या नवीन दाव्यामुळे बीड जिल्ह्यात खळबळ माजली आहे. 

हे पण वाचा  मुंबई पोलीस दलात आर्थिक गुप्तवार्ता कक्ष स्थापन

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

Advt