चितळे बंधू मिठाईवाले यांच्या नावाचा गैरवापर

बनावट बाकरवडी विकणाऱ्या चितळे स्वीट होमच्या संचालकांवर गुन्हा

चितळे बंधू मिठाईवाले यांच्या नावाचा गैरवापर

पुणे: प्रतिनिधी 

खवैय्यांच्या जगतात मानाचे स्थान असलेल्या चितळे बंधू मिठाईवाले यांच्या नावाचा गैरवापर करून बनावट बाकरवडी विकणाऱ्या चितळे स्वीट होमचे संचालक प्रभाकर चितळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मागील काही दिवसापासून चितळे बंधू मिठाईवाले यांचे लोकप्रिय उत्पादन असलेल्या बाकरवडीची चव बदलल्याच्या तक्रारी चितळे बंधू यांच्याकडे वारंवार येत असल्याने त्यांनी आपल्या सर्व विक्रेत्यांकडून बाकरवडीचे नमुने मागवून घेतले. यावेळी चितळे स्वीट होमकडून चितळे बंधू मिठाईवाले यांच्या नावाचा गैरवापर करून विशेषतः ऑनलाइन बाकरवडी विक्री केली जात असल्याचे उघड झाले. 

चितळे स्वीट होम यांच्या बाकरवडीच्या पॅकिंगवर संपर्कासाठी चितळे बंधू मिठाईवाले यांचा ई-मेल आयडी आणि ग्राहक सेवा मोबाईल क्रमांक छापून हे उत्पादन चितळे बंधू मिठाईवाले यांचे असल्याचे भासवले जात आहे, असे निदर्शनास आले. 

हे पण वाचा  जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन!

या प्रकाराबद्दल छडा लावण्यासाठी चितळे बंधू मिठाईवालेचे भागीदार इंद्रनील चितळे यांचे स्वीय सहाय्यक नितीन दळवी यांनी विविध ठिकाणी विक्रीला असणारी चितळे स्वीट होमची बाकरवडी विकत घेतली. खातरजमा करण्यासाठी त्याचे नमुने चितळे बंधू मिठाईवाले यांच्या भोर येथे बाकरवडी उत्पादन केंद्रात पाठविण्यात आले. त्या ठिकाणी तपासणी केल्यानंतर हे उत्पादन आणि चितळे बंधू मिठाईवाले यांचे उत्पादन यात फरक असल्याचे निष्पन्न झाले. 

या प्रकाराबाबत पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने प्रभाकर चितळे यांच्यावर भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. 

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

Advt