डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समितीकडून संयुक्त अभिवादन

विविध क्षेत्रातील मान्यवरांचाही करण्यात आला सन्मान

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समितीकडून संयुक्त अभिवादन

  पुणे : प्रतिनिधी 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समितीच्या वतीने आज सकाळी दहा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सर्वपक्षीय कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या वतीने संयुक्त अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा निळा फेटा, शाल व पेढा देऊन सन्मान करण्यात आला.

पुण्याचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या अभिवादन आणि सन्मान सोहळ्यात माजी नगरसेवक अविनाश साळवे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे प्रदेश संघटक परशुराम वाडेकर, रिपब्लिकन युवा मोर्चाचे  राहुल डंबाळे, सुवर्णा डंबाळे, शैलेंद्र मोरे, राहुल नागटिळक, माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे , माजी उपमहापौर सुनिता वाडेकर, अतुल साळवे , प्रदिप देशमुख , अभय छाजेड , पंडितराव कांबळे, लुकस केदारी  यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते. 

यावेळी सुमारे 300 मान्यवर पदाधिकाऱ्यांचा निळा फेटा बांधून तसेच शाल देऊन सत्कार करण्यात आला व सुमारे 134 किलो पेढ्यांचे वाटप यावेळी करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन मध्यवर्ती समितीचे राहुल डंबाळे, सुवर्णा डंबाळे व इतर मान्यवरांनी केले होते. 

हे पण वाचा  'छत्रपती शिवाजी महाराज देशासह जगासाठी प्रेरणास्थान'

मध्यवर्ती समितीच्या वतीने आयोजित सभेमध्ये माजी आमदार जयदेव गायकवाड, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर व शिवसेना शिंदे गटाचे अजय भोसले व  इतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी आलेल्या आंबेडकरी अनुयायांना उत्तम प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज यांचा तसेच शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांचाही विशेष सन्मान डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समितीकडून करण्यात आला.

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

विश्व हिंदू परिषद मावळ तालुका बजरंग दलाच्या वतीने वडगावात तहसिल कार्यालय मोर्चा विश्व हिंदू परिषद मावळ तालुका बजरंग दलाच्या वतीने वडगावात तहसिल कार्यालय मोर्चा
वडगाव मावळ/ प्रतिनिधी  पश्चिम बंगालमध्ये हिंदू समाजावर सातत्याने होणारे हल्ले, जाळपोळ, धार्मिक द्वेष भावना वाढविणारे प्रकार आणि शासन यंत्रणेचे अपयश...
फुले सिनेमा समाजप्रबोधन करणारा क्रांतिकारी सिनेमा ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
इंग्रजीला पालखी आणि हिंदीला विरोध हा कुठला विचार?
चाफेकर बंधुंचे स्मारक देशभक्तीचे संस्कार देणारे केंद्र
'भाषा शिकण्यावरून वाद हा रिकाम टेकड्यांचा उद्योग'
चाकणसह छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार टेस्लाचे उत्पादन
संग्राम थोपटे लवकरच होणार भाजपमध्ये डेरेदाखल

Advt