'काश्मीर जाऊ देणार नाही दहशतवाद्यांच्या हाती'

मशिदीमधून करण्यात आला पहेलगाम हल्ल्याचा निषेध

'काश्मीर जाऊ देणार नाही दहशतवाद्यांच्या हाती'

श्रीनगर: वृत्तसंस्था 

दहशतवादी आणि त्यांच्या कारवायांना काश्मीरमधील स्थानिक जनतेकडून सहानुभूती मिळत नसल्याचे पहलगाम मधील हल्ल्यानंतर स्पष्ट झाले आहे. हा हल्ला इस्लाम आणि मानवतेच्या विरोधात असल्याचे सांगत मशिदींमधून या हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. हा हल्ला घडवून आणणाऱ्या दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ही करण्यात आली आहे. काश्मीर हे आमचे घर असून ते दहशतवाद्यांच्या हाती जाऊ देणार नाही, अशी घोषणाही करण्यात आली आहे.

पहलगाम येथे दहशतवाद्यांनी 40 पर्यटकांना घेरून त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात 27 जण ठार तर 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी लष्करे तय्यबाच्या दि रेजिस्टन्स फ्रंट या संघटनेने स्वीकारली आहे. या हल्ल्याचा कट पाकिस्तानातील रावळपिंडी येथे रचल्याचा दावा भारतीय गुप्तचर यंत्रणांनी केला आहे. पाकिस्तानने मात्र या हल्ल्याशी आपला कोणताही संबंध नसल्याचे सांगितले आहे.

पहलगाममधील हल्ल्यानंतर मशिदीमधून त्याचा निषेध करण्यात आला. या हल्ल्याच्या निषेधार्थ जम्मू काश्मीरच्या अनेक शहरांमध्ये बंद पुकारण्यात आला आहे. अनेक ठिकाणी नागरिकांनी मेणबत्ती मोर्चाही काढला. दहशतवादाला कोणताही धर्म नसतो. काश्मीरला अशांत करण्याच्या कटाचा हा हल्ला एक भाग आहे, अशा भावना व्यक्त करून या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. 

हे पण वाचा  पाकिस्तानच्या विरोधात भारताने उचलली कठोर पावले

About The Author

Advertisement

Latest News

Advt