मुंबई पुण्यासह कोकण किनारपट्टीवर 'हाय अलर्ट'

दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क

मुंबई पुण्यासह कोकण किनारपट्टीवर 'हाय अलर्ट'

मुंबई: प्रतिनिधी

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई, सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर असलेले पुणे या शहरांसह कोकण किनारपट्टीवर 'हाय अलर्ट' जारी करण्यात आला असून पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. 

महाराष्ट्रातील मुंबई, पुण्यासह अनेक पर्यटन स्थळांवर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कोकणच्या रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टीच्या भागांवरही सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. किनारपट्टीकडे जाणाऱ्या सर्व वाहनांची कसून तपासणी व प्रवाशांची चौकशी करण्यात येत आहे.

गर्दीची ठिकाणे, महत्त्वाच्या इमारती व संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सर्व पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि परिमंडळाचे उपायुक्त यांना अधिक सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांनी देखील संशयास्पद व्यक्ती, हालचाली अथवा वस्तू निदर्शनास आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. 

हे पण वाचा  'मराठा आरक्षणावरील सुनावणीसाठी स्वतंत्र खंडपीठ स्थापन करा'

About The Author

Advertisement

Latest News

'राहुल व सोनिया गांधी यांनी गुन्हेगारी कृत्यातून मिळवले 142 कोटी' 'राहुल व सोनिया गांधी यांनी गुन्हेगारी कृत्यातून मिळवले 142 कोटी'
नवी दिल्ली: प्रतिनिधी  नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात काँग्रेसचे सर्वोच्च नेते सोनिया व राहुल गांधी यांनी गुन्हेगारी कृत्यांद्वारे तब्बल 142 कोटी रुपयांचा...
राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याच्या सुनेने केली आत्महत्या
मोहम्मद युनूस यांची लवकरच हकालपट्टी?
मधमाशा पालन, संवर्धनासाठी जनजागृती हवी:डॉ.सावंत
मुक्त पत्रकारांसाठी धोरणात्मक पाठबळ हवे - सुभाष देसाई
जागतिक हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कृषी परिषद
'एकात्मिक आंतरजातीय विवाह योजना' बंद करणे हा सामाजिक अन्याय

Advt