बी जे वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग झाल्याची तक्रार

मंत्रालयातून सूत्र फिरल्यानंतर महाविद्यालय प्रशासनाकडून दखल

बी जे वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग झाल्याची तक्रार

पुणे: प्रतिनिधी

येथील प्रतिष्ठित बी जे वैद्यकीय महाविद्यालयात कनिष्ठ निवासी डॉक्टरवर वरिष्ठ निवासी डॉक्टरांकडून रॅगिंग झाल्याचा प्रकार उघड केला आहे. महाविद्यालय प्रशासनाकडून दखल घेतली न गेल्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांनी थेट मंत्रालयात तक्रार केली. मंत्रालयातुन सूत्रे फिरल्यावर मंगळवारी रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी चौकशी करण्यात आली. 

बी जे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अस्थिव्यंगोपचार (ऑर्थोपेडिक) विभागात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या कनिष्ठ निवासी डॉक्टरने तीन वरिष्ठ निवासी डॉक्टर आपल्यावर रॅगिंग करीत असल्याची तक्रार महाविद्यालय प्रशासनाकडे केली. मात्र, या तक्रारीला प्रतिसाद न मिळाल्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांनी मंत्रालयात धाव घेतली. मंत्रालयातून विचारणा झाल्यानंतर रॅगिंग विरोधी चौकशी समिती स्थापन करून महाविद्यालयाने तक्रारदार आणि आरोपी विद्यार्थ्यांची बाजू समजावून घेतली. या प्रकरणात आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही देखील प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 

प्रशासनाने केला हलगर्जीपणाचा इन्कार 

हे पण वाचा  महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार

संबंधित निवासी डॉक्टर आणि त्यांचे पालक यांच्याकडून महाविद्यालय प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोप करण्यात आला आणि त्यामुळेच आपल्याला मंत्रालयाचे दार ठोठावावे लागले, असे सांगण्यात आले असले तरी देखील ससून रुग्णालय आणि बी जे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी या आरोपाचा इन्कार केला आहे. आम्हाला रॅगिंग प्रकरणी सोमवारी संध्याकाळी लेखी तक्रार प्राप्त झाली. त्यानंतर चौकशीला सुरुवात करण्यात आली असून तीन आरोपी निवासी डॉक्टरांना चौकशी पूर्ण होईपर्यंत वसतिगृहात राहण्यास मज्जाव करण्यात आला आहे. याप्रकरणी अहवाल तयार करण्याचे काम सुरू असून दोषींवर योग्य ती कारवाई होईल, अशी खात्री देखील त्यांनी दिली. 

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

भारतात जातीवर आधारित जनगणना होणार भारतात जातीवर आधारित जनगणना होणार
नवी दिल्ली: प्रतिनिधी  देशभरात जातीवर आधारित जनगणना करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना केंद्रीय मंत्री अश्विनी...
'पाकिस्तानवर कारवाईबाबत पंतप्रधानांना पूर्ण सहकार्य'
बी जे वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग झाल्याची तक्रार
'भारताकडून चोवीस ते छत्तीस तासात होऊ शकतो हल्ला'
पाकिस्तानवरील कारवाईचे सर्वाधिकार सैन्याकडे
'भारताने पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्यावे'
शेतकऱ्याच्या विहिरीतून चोरले चक्क पाच टँकर पाणी

Advt