छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा मोठया उत्साहात

'शिव पर्वती विवाह सोहळा’ ठरला प्रमुख आकर्षण

 छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा मोठया उत्साहात

पुणे : प्रतिनिधी

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा मोठया उत्साहात कसबा पेठेतील फडके हौद चौकात साजरा करण्यात आला. यामध्ये संभाजी महाराज यांच्या 12 फूटी मूर्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.महाराष्ट्रातील प्रसिद्ध श्रीमंत शिवशाही प्रतिष्ठान गणेश लोणारे प्रस्तुत ‘शिव पर्वती विवाह सोहळा’(जिवंत देखावा)या जन्मोत्सव सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले. या भव्य,नेत्रदीपक सोहळ्याचे आयोजन किशोर उर्फ राजेंद्र भगवान तरवडे यांच्या वतीने करण्यात आले होते.

 यावेळी प्रमुख पाहुणे नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचे वंशज सुभेदार कुणालदादा मालुसरे, छत्रपती संभाजी महाराजांचे दुधभाऊ, वीरधाराऊ माता गाडे पाटील यांचे वंशज सरनोबत अमितदादा गाडे पाटील, किल्ले रायगड निर्माता हिरोजी इंदलकर यांचे वंशज समीरजी इंदलकर, सरसेनापती वीर बाजी पासलकर यांचे वंशज सरसेनापती अविनाशदादा पासलकर, सरसेनापती हंबीरराव मोहिते पाटील यांचे वंशज राजेंद्रदादा मोहिते पाटील, गडदुर्ग संवर्धन ट्रस्ट महाराष्ट्र राज्य विश्वस्त. श्रीमंत सचिनदादा भोसले पाटील, सरनौबत येसाजी कंक यांचे 14 वे वंशज रविंद्र श्रीपतराव कंक, पुणे शहर भाजपा अध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज चित्रपटातील अभिनेते अनुप सिंग ठाकूर उपस्थित होते. 

यावेळी मेघराज राजेभोसले, आदित्य जयकुमार गोरे, मेघना किशोर तरवडे, बाळासाहेब दाभेकर, अमित कंक, सम्यक साबळे, संजय अग्रवाल, ज्योती सावर्डेकर,माजी नगरसेवक योगेश समेळ, विशाल धनवडे, पल्लवीताई जावळे या मान्यवरांनी हजेरी लावली.

हे पण वाचा  पोलिसांना भोवली गजा मारणेची मटण पार्टी

यावेळी त्र्यंबकेश्वर प्रतिष्ठान आखाडा, कसबा पेठ यांनी शिवकालीन मर्दानी खेळ सादर करत उपस्थितांची मने जिंकली. 

याप्रसंगी बोलताना आयोजक किशोर उर्फ राजेंद्र भगवान तरवडे म्हणाले, यंदा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्याचे चौथे वर्ष आहे. जन्मोत्सव धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याचे स्मरण करण्यासाठी प्रत्येक गावातील आणि शहरातील मंडळांनी धर्मवीर संभाजी महाराजांची जयंती वैविध्यपूर्ण उपक्रमांनी साजरी केली पाहिजे.

About The Author

Advertisement

Latest News

वडगाव नगरपंचायत स्वागत कमानीवरील नाव बेकायदेशीर असल्याची नागरीकांची मागणी वडगाव नगरपंचायत स्वागत कमानीवरील नाव बेकायदेशीर असल्याची नागरीकांची मागणी
वडगांव मावळ/प्रतिनिधी  वडगाव नगरपंचायत हद्दीतील मुख्य रस्त्यावर उभारण्यात आलेली स्वागत कमानीवर जे नाव टाकण्यात आले आहे ते नाव बेकायदेशीर असल्याचा...
पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदी संदीपसिंह गिल्ल यांची नियुक्ती
लाडकी बहिण योजनेचा श्रेयवाद महायुतीत सुरूच?
अधिकाधिक असंघटित कामगारांना ई श्रमिक कार्ड देणार: चॅटर्जी
छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी
पाकिस्तानप्रमाणेच बीडमध्ये राबवा 'ऑपरेशन सिंदूर'
स्वबळ की महायुती? भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता

Advt