शहराचा सिमेंट काँक्रिटचा विकास होत असताना मंदिरासमोरील गोमाता पालिकेच्या कोंडवाड्यात

५० वर्षापासूनच्या वृद्ध विधवा गोसेविकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर 

शहराचा सिमेंट काँक्रिटचा विकास होत असताना मंदिरासमोरील गोमाता पालिकेच्या कोंडवाड्यात
मुंबई / रमेश औताडे 
 
मुंबईचा सिमेंट काँक्रिटचा आडवा उभा विकास होत असताना मुंबईतील मंदिरासमोरील जिवंत गोमाता मात्र कोंडवाड्यात टाकल्या जात आहेत. शासन पोलिस पालिका एकमेकाकडे बोट दाखवत असल्याने गोमाता सेवकांनी तीव्र आंदोलन करत सरकारचा निषेध केला.
 
मुंबई व मुंबई परिसरातील मंदिरासमोर गाय घेऊन भक्तांच्या दर्शनासाठी कार्यरत असणाऱ्या अनेक नाथपंथी गोसावी सेविका न्याय मागण्यासाठी आक्रमक होत बुधवारी मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयाबाहेर सरकारच्या नावाने निषेध व्यक्त करत होत्या. महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय मंत्री यांच्या मंत्रालयातील कार्यालयातून कार्यालयातून या सेविकांना मुंबई पोलिस आयुक्तांना भेटा असे सांगत पत्र दिले.
 
त्याप्रमाणे या ४०० गोसेविका व गो सेवक पोलिस आयुक्त कार्यालय मुंबई येथे भेट घेण्यास आल्या असता त्यांना पोलिसांनी योग्य ती कार्यवाही करून न्याय दिला जाईल असे सांगितले. गेल्या ५० वर्षांपासून या गोमाता सेविका गाई ला चारा व कोंड्याचे लाडू चारून दोन पैसे कमवत  उदरनिर्वाह करत आहेत. अनेक महिला विधवा आहेत तर काही वयोवृद्ध आहे. स्वर्गीय पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या निधनाची बातमी कळताच ७० वर्षीय पार्वती शिंदे यांनी आपली गाय गोठ्यात बांधून दुखवटा व्यक्त केला. तेव्हापासून पार्वती शिंदे आजही गोमातेच्या माध्यमातून उदरनिर्वाह करत आहेत.
 
अद्याप आम्हाला ओळखपत्र दिले नाही.असे सांगत नाथपंथी डवरी गोसावी गोसेविका संस्थेच्या अध्यक्षा कल्पना चव्हाण म्हणाल्या सरकारने ओळखपत्र द्यावे.खजिनदार स्वाती चव्हाण, सचिव नंदा शिंदे, केशव चव्हाण आदी गोसेवक व गोसेविका यांनी यावेळी आपल्या व्यथा सांगितल्या.आमच्या गाई पालिकेने मालाड येथील कोंडवाड्यात ठेवल्या आहेत. त्यांना हिरवा चारा मिळत नाही. त्यांना आमच्यापासून दूर केल्याने आम्हाला झोप येत नाही.गाई हंबरडा फोडत आहेत.
Tags:

About The Author

Advertisement

Latest News

'माझ्यामुळेच थांबले भारत पाकिस्तानातील युद्ध' 'माझ्यामुळेच थांबले भारत पाकिस्तानातील युद्ध'
वॉशिंग्टन: वृत्तसंस्था  भारत आणि पाकिस्तान या अण्वस्त्रधारी राष्ट्रांमधील युद्ध आपल्यामुळेच थांबल्याचा दावा करीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 'तात्या' यांनी पुन्हा...
रिपब्लिकन पक्षातर्फे देशभर भारत जिंदाबाद यात्रा चे आयोजन
शहराचा सिमेंट काँक्रिटचा विकास होत असताना मंदिरासमोरील गोमाता पालिकेच्या कोंडवाड्यात
पुण्यात विविध ठिकाणी बॉम्बस्फोटाची धमकी
'राहुल व सोनिया गांधी यांनी गुन्हेगारी कृत्यातून मिळवले 142 कोटी'
राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याच्या सुनेने केली आत्महत्या
मोहम्मद युनूस यांची लवकरच हकालपट्टी?

Advt