पुणेरी रॅम्बो सर्कसने कोरोना काळानंतर टाकली कात
नव्या स्वरूपात पुण्यात दाखल
आंतरराष्ट्रीय सर्कस नकाशावर पुण्याचे नाव ठळकपणे नोंदवणारी जागतिक कीर्तीची रॅम्बो सर्कस पुण्यात मुंढवा येथे रेल्वे ओव्हर ब्रिज जवळील मैदानात रविवार दि .५ फेब्रुवारी रोजी सूरु झाली.
पुणे: प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय सर्कस नकाशावर पुण्याचे नाव ठळकपणे नोंदवणारी जागतिक कीर्तीची रॅम्बो सर्कस पुण्यात मुंढवा येथे रेल्वे ओव्हर ब्रिज जवळील मैदानात रविवार दि .५ फेब्रुवारी रोजी सूरु झाली.
सर्कसचे रोज दुपारी ४.३० आणि सायंकाळी ७.३० असे शो असून तिकीट दर : ७०० रु + जी एस टी ,५०० रु,३५० रु ,२०० रु.आहे. रोज सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत आगाऊ बुकिंग उपलब्ध असून सर्व प्रेक्षकांच्यासाठी रॅम्बो सर्कस डेबिट/क्रेडिट कार्ड द्वारे पेमेंट स्वीकारले जाईल . www.rambocircus.in अथवा 9611554897 वर कॉल केल्यास बुकिंग उपलब्ध होईल .तसेच Instgram : weloverambocircus facebook : /rambocircus.india Sub scribe us on Youtube : rambocircus सर्कस प्रेमींना सर्कसला फोलो करता येईल.
सर्व प्रेक्षकांना बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे .तीन वर्षा खालील बालकांना प्रवेश मोफत आहे. तसेच,अपंग ,अंध ,मतीमंद , मुलामुलींच्या संस्थांनी संपर्क साधल्यास त्यांना मोफत सर्कस दाखवली जाईल .सैनिकांच्या कुटुंबियांना देखील सवलतीच्या दरात प्रवेश दिला जाईल.पार्किंगची व्यावस्था आहे.अशी माहिती, रॅम्बो सर्कसचे प्रसिद्धीप्रमुख प्रवीण प्र. वाळिंबे यांनी दिली .
कोरोनाच्या २ वर्षानंतर नव्या जोमाने सुरु झालेल्या रॅम्बो सर्कस मध्ये १२०० प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था आहे . यामध्ये ११० हून अधिक स्त्री-पुरुष कलावंत असून ,सर्कसचा स्वतःचा स्वतंत्र बँड आहे. यामध्ये मृत्युगोलात मोटार सायकल वरून चित्तथरारक कसरती ,व्हील ऑफ डेथ ,फ्लायिंग ट्रपिझ, स्वर्ड बॅलन्स,जग्लिंग ,नवर्पट्टी,क्विक चेंज ,इ स्केटिंग ,कॅण्डल ,वाॅटर शो, इ स्कीप्पिंग जंप ,रोलाबाला ,बेबी रोप ,ग्लोब ,रिंग डान्स ,जर्मन वेल्स ,रिंग ऑफ डेथ ,सायकल मनोरा आदि कलाप्रकार प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतील . सर्कसमध्ये ५ विदुषक असून वैविध्यपूर्ण कारामातींच्याद्वारे ते बच्चे कंपनीला आनंद देतील.