'... तर खुर्चीवर बसलेले कमजोर होते का?'

राऊत यांच्या आरोपावर पटोले यांचा पलटवार 

'... तर खुर्चीवर बसलेले कमजोर होते का?'

मी राजीनामा दिला नसता तर महाविकास आघाडी सरकार पडले नसते, हे सांगून शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी माझ्या शक्तीची जाणीव देशाला करून दिली आहे. मात्र, त्यावेळी खुर्चीवर बसलेल्यांचा पक्ष आणि नेतृत्व सरकार टिकविण्यास कमजोर होते का, असा कडवट सवाल करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष. नाना पटोले यांनी राऊत यांच्यावर पलटवार केला आहे. 

मुंबई: प्रतिनिधी 
 
शिंदे गटाने बंड केल्यावर पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर अपात्र आमदार ठरविणे सोपे झाले असते आणि सरकार पडले नसते, अशी टीका राऊत यांनी केली असून त्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी दुजोरा दिला आहे. या आरोप वजा टीकेला पटोले यांनी सडेतोड उत्तर देत शिवसेना नेतृत्वाकडेच बोटं रोखले आहे. 
 
मला विधानसभा अध्यक्षपद देणे हा निर्णय तत्कालीन पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचा होता आणि मी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देणे हा निर्णयही त्यांचाच होता. सहयोगी पक्षाच्या नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयाबद्दल टीकाटिप्पणी करणे अयोग्य आहे, असेही पटोले यांनी राऊत यांना सुनावले. 
 
त्यावेळी मी राजीनामा दिल्यामुळे खोक्याचे सरकार आले, असे राऊत यांचे म्हणणे आहे. विधानसभा अध्यक्ष म्हणून माझ्याकडे संवैधानिक शक्ती होती. राऊत यांनी माझ्या शक्तीचे संपूर्ण देशाला प्रदर्शन घडविले आहे. मात्र, त्यावेळी सरकार वाचविण्यासाठी सत्तेच्या खुर्चीवर बसलेल्या लोकांकडे उपाय नव्हते का? त्यांचा पक्ष आणि नेतृत्व त्यासाठी कमजोर पडले का, अशा प्रश्नांची सरबत्ती पटोले यांनी केली आहे. 

Share this article

About The Author

Post Comment

Comment List

Follow us