विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर
इच्छुकांच्या भाऊ गर्दीतून निवडली गेली नावे
मुंबई: प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत यश प्राप्त झाल्यानंतर महायुती विधान परिषद निवडणुकीसाठी सज्ज झाली असून भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीसाठी आपले तीन उमेदवार जाहीर केले आहेत. या उमेदवारीतून पक्षाने प्रादेशिक, सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. या निवडणुकीत भाजप तीन, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट प्रत्येकी एका जागेवर निवडणूक लढणार आहे.
भाजपकडून विधान परिषदेसाठी संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सर्व उमेदवार उद्या आपला अर्ज दाखल करणार आहेत. विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडे इच्छुकांची भाऊ गर्दी असल्याने त्याच्यातून योग्य उमेदवार निवडणे हे पक्षापुढे मोठे आव्हानच होते.
या उमेदवारांपैकी संदीप जोशी हे नागपूरच्या असून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांनी यापूर्वी नागपूरच्या महापौरपदाची जबाबदारी पार पाडली आअसूनसंजय केनेकर हे छत्रपती संभाजी नगर येथील असून पक्ष संघटना वाढवण्यासाठी त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. बूथ स्तरावरून काम सुरू केलेल्या केनेकर यांची कार्यक्षमता पाहून पक्षाने त्यांच्यावर महामंत्री पदाची जबाबदारी सोपवली. ती त्यांनी प्रभावीपणे पार पाडली. पक्षाचे तिसरे उमेदवार दादाराव केचे हे आर्वीचे माजी आमदार आहेत. विधानसभा निवडणुकीत त्यांच्या जागेवर देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी सुमित वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली. त्याची परतफेड म्हणून त्यांना ही उमेदवारी देण्यात आली असावी.
Comment List