'... तर सत्ता हस्तगत करण्याचा दिवस दूर नाही'

राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांमध्ये जागवला विश्वास

'... तर सत्ता हस्तगत करण्याचा दिवस दूर नाही'

ठाणे: प्रतिनिधी

मतदार इतर सर्वच राजकीय पक्षांना कंटाळले आहेत. ते निश्चितपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संधी देतील. आपण त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करू शकलो तर सत्ता हस्तगत करण्याचा दिवस दूर नाही, अशा शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या मनात त विश्वास जागवला. 
 
मनसेच्या सतराव्या वर्धापन दिनानिमित्त गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ठाकरे बोलत होते. 
 
सर्वच राजकीय पक्षांकडून मतदारांचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे मतदार मनसेला संधी दिल्याशिवाय राहणार नाही. जाहीर सभा आणि मेळाव्यातून आपण जनतेशी संपर्क साधू. मात्र, घराघरापर्यंत पोहोचून मतदारांमध्ये मनसे बद्दल विश्वास निर्माण करणे हे कार्यकर्त्यांचे काम आहे. हे काम चोखपणे पार पाडले गेले तर सत्ता हस्तगत करणे अवघड नाही, असे ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले. 
 
भारतीय जनता पक्षाने जनसंघ म्हणून सन 1952 पासून केलेली सुरुवात ते 2014 मध्ये मिळविलेले पूर्ण बहुमत हा सर्व प्रवास ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमोर उलगडून दाखवला. मनसेला सत्ता हस्तगत करण्यासाठी एवढा कालावधी लागेल असे आपले म्हणणे नाही. मात्र, राजकारणात स्थित्यंतर घडविण्यासाठी भाजपाने केलेला संघर्ष आणि उपसलेले कष्ट अनुकरणीय आहेत, असेही ठाकरे यांनी नमूद केले. 
 
भरतीनंतर ओहोटी येणारच
 
सध्या भारतीय जनता पक्षाचे भरतीचे दिवस आहेत. मात्र, भरतीपाठोपाठ ओहोटीही येणारच हा निसर्गाचा नियम आहे.  त्यामुळे आपल्या लोकप्रियतेला ही ओहोटी लागणार याची जाणीव भाजपने त्यांनी ठेवावी, असेही ठाकरे म्हणाले. 
 
महापालिका निवडणुका स्वबळावर
 
मागील काही काळापासून मनसेची भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्याशी जवळीक असल्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. त्या अनुषंगाने आगामी महापालिका निवडणुकीत मनसेला युतीत समाविष्ट करून घेतले जाईल असे कयास बांधले जात आहेत. मात्र, आगामी महापालिका निवडणुकीत कोणत्याही पक्षाशी निवडणूक पूर्व युती करणार नसून मनसे स्वबळावर निवडणूक लढवेल, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. 

Share this article

About The Author

Post Comment

Comment List

Follow us

Latest News

प्रशांत दामले यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा नामंजूर
विरोधी गटाचे मताधिक्य रोखण्याचे सत्ताधारी गटाकडे मोठे आव्हान!
निवडणूक सह्याद्री साखर कारखान्याची पण पेरणी मात्र नगरपरिषद निवडणुकीची!
'मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे'
'वाचाळ मंत्र्याला वेळीच आवर घालणे आवश्यक'
आजपासून माथेरान पर्यटकांसाठी बेमुदत बंद
पीएचडी मार्गदर्शकांचे गैरव्यवहार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करा
'समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही'
'आम्ही बहिणींचे लाडके, त्यामुळे तुम्ही झाले दोडके'
'विधानसभा निवडणुकीतील महायुतीचा विजय डुप्लिकेट'