'२२ मराठा बटालियन- गोष्ट गनिमी काव्याची' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

तगडी स्टारकास्ट असलेल्या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित 

'२२ मराठा बटालियन- गोष्ट गनिमी काव्याची' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

पुणे: प्रतिनिधी

 मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक आणि थरारक कथानकांनी प्रेक्षकांच्या मनात नेहमीच खास स्थान मिळवलं आहे. त्याच परंपरेला पुढे नेणारा एक दमदार,  रोमांचकारी आणि मराठा बटालियनच्या शौर्यगाथेवर भाष्य करणारा  ‘२२ मराठा बटालियन – गोष्ट गनिमी काव्याची’ २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाची सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक पराक्रमी योद्धेच नव्हते तर कुशल युद्धनीतीकारही होते. त्यांच्या युद्धशैलीत 'गनिमी कावा’ या विशेष तंत्राचा उपयोग करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी कावा तंत्राचे हे विविध पैलू या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहेत. 

नुकत्याच झळकलेल्या पोस्टरने रसिकांमध्ये चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. नजरेत भरणारे दाट जंगल आणि त्यात झळकणारा ‘२२ मराठा बटालियन’ हा शब्द प्रेक्षकांना चित्रपटाच्या कथानकाबद्दल नक्कीच विचार करायला लावेल. अद्वितीय साहस, गनिमी काव्याची रणनीती हे सगळे या चित्रपटात पाहायला मिळणार असून हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी एक रोमांचक अनुभव ठरेल, यात शंकाच नाही.

दिग्दर्शक प्रकाश जनार्दन पवार म्हणतात," ‘२२ मराठा बटालियन' हा चित्रपट म्हणजे शौर्य आणि रणनीतीचा जगासमोर आलेला एक इतिहास आहे. गनिमी कावा हे केवळ एक युद्धतंत्र नव्हते तर ती एक रणनिती होती. शत्रूला हरवण्याची. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज एक यशस्वी योद्धा ठरले. हेच या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. पोस्टरमधून प्रेक्षकांच्या मनात जी उत्सुकता निर्माण झाली ती चित्रपट पाहताना अधिकच वाढेल, याची आम्हाला मला खात्री आहे. या चित्रपटात अनेक तगडे कलाकार आहेत त्यामुळे चित्रपटाची उंची अधिक वाढली आहे. आम्हाला आशा आहे की, हा चित्रपट प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल."

हे पण वाचा  कुसुमाग्रज स्मारकाला डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट

शकुंतला क्रिएशन प्रॉडक्शन आणि एस आर फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केले असून रुपेश दिनकर आणि संजय बाबूराव पगारे यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे. या चित्रपटाची पटकथा व संवाद नीलेश महिगावकर यांनी लिहिले आहेत. चित्रपटात प्रवीण तरडे, प्रसाद ओक, अशोक समर्थ, पुष्कर जोग, सोमनाथ अवघडे, अभिनय बेर्डे, उत्कर्ष शिंदे, यश डिंबळे, सपना माने, टिशा संजय पगारे, अमृता धोंगडे, शिवाली परब, आयुश्री पवार अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार असून ‘२२ मराठा बटालियन – गोष्ट गनिमी काव्याची’ हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे.

About The Author

Advertisement

Latest News

पिंपरी - चिंचवड स्मार्ट सिटी आणि महापालिका इंटीग्रेटेड  सॉफ्टवेअर वर्षाअखेरीस कार्यान्वित पिंपरी - चिंचवड स्मार्ट सिटी आणि महापालिका इंटीग्रेटेड  सॉफ्टवेअर वर्षाअखेरीस कार्यान्वित
  मुंबई : स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र सरकार 50 टक्के आणि राज्य सरकार व स्थानिक स्वराज्य संस्था प्रत्येकी 25 टक्के
'भारतातील जनता नाही तर नेतेच जातीयवादी'
'सुशांतसिंग राजपूतची हत्या नव्हे तर आत्महत्याच'
पुणेकरांचे प्रेम कधीही विसरू शकत नाही - अशोक सराफ
समाजाचा ढळलेला तोल सावरण्यासाठी श्री स्वामी समर्थांचे स्मरण आवश्यक!
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकर पळून जाताना पोलीस झोपले होते का? : हर्षवर्धन सपकाळ
औंध रुग्णालयाच्या आवारात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारावे

Advt